लेह-लडाखमध्ये शनिवारी झालेल्या अपघातात हिमाचल येथील एक जवान शहीद झाले. लान्स नाईक विजय कुमार असं या जवानाचे नाव आहे, त्यांचं गाव हिमाचल येथील दिमानी ब्लॉक बसंतपूर, जिल्हा शिमला ग्रामीण येथे आहे जवान विजय कुमार यांचे पार्थिव विमानाने चंदीगडला नेण्यात आले. यानंतर त्यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने शिमला येथे पोहोचले. मृतदेह शिमल्याहून बसंतपूरला रस्त्याने आणण्यात आला. शहीद विजय कुमार यांच्या गावकऱ्यांना विजय कुमार शहीद झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी कधी पोहोचेल आणि त्यांचे अंतिम दर्शन कधी होईल, याकडे सर्वजण वाट पाहत होते.
जगावर वचक ठेवायला निघालेले! रशियाचे लुना २५ चंद्रावर काय आदळले, तिकडे चीनला जबर दणका बसला
विजय कुमार यांच्याबद्दल गाववाल्यांना खूप आपुलकी होती. त्यांचं गाव ग्रामीण भागातील असल्यामुळे रस्ते पक्के नव्हते. त्यात स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नव्हता. पण, गावकऱ्यांनी काही तासातच स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता बनवला. हा रस्ता ४०० मीटरचा आहे. रविवारी रात्री ८ वाजता रस्ता बनवण्याचे काम सुरू झाले आणि दुसऱ्या दिवशी रस्ता तयार झाला.
रस्त्यासाठी जमीन केली दान
शहीद विजय कुमार यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक तेथे जमतील हे गावकऱ्यांना माहीत होते. विजय कुमार यांचे पार्थिव स्मशानभूमीपर्यंत नेण्यास कोणतीही अडचण येऊ नये, म्हणूनच हा रस्ता एका रात्रीत तयार करण्यात आला. रस्त्याच्या कामासाठी गावकऱ्यांनी आपली जमीनही दान केली होती. एवढेच नाही तर ग्रामस्थांनी या रस्त्याला शहीद विजयकुमार मार्ग असे नाव दिले आहे. ज्यांना येणारी पिढी आणि गावातील प्रत्येक व्यक्ती विजय कुमार यांच्या हौतात्म्याची आठवण ठेवेल. विजय कुमार यांच्या कुटुंबात फक्त आई-वडील, पत्नी आणि दोन मुले आहेत. एक मुलगा दीड वर्षाचा तर दुसरा सुमारे ७ वर्षांचा आहे. विजय कुमार यांनी सैन्यात भरती होण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. विजय कुमार यांनी सैन्यात १७ वर्षे सेवा दिली. स्वभावाने अतिशय चांगले होते. सगळ्यांच्यात मिळून मिसळून होते, विजय जेव्हा कधी गावात यायचे तेव्हा ते गावातील मुलांना खेळ आणि सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरित करत असे, असं गावकरी सांगतात.
शनिवारी लडाखमध्ये झालेल्या अपघातात हवालदार विजय कुमार शहीद झाल्याची बातमी घरी पोहोचताच संपूर्ण गावात शोककळा पसरली. शहीद विजय यांच्या अंतिम यात्रेत शेकडो लोक सहभागी झाले होते.