शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

खोटे दाखले, ठराव करून दारू दुकानास परवानगी वावडदा येथे ग्रामस्थांचा आक्षेप : ग्रामसेवक, सदस्यांवर आरोप

By admin | Published: April 05, 2016 12:13 AM

जळगाव- वावडदा ता.जळगाव येथे ग्रामसेवक, ग्रा.पं.च्या सदस्यांनी खोटे दाखले व खोटे ठराव करून गावात देशी दारूचे दुकान उघडण्यास परवानगी दिली आहे. हे दारूचे दुकान गावात आले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्यास पोलीस प्रशासन व जि.प.तील संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, अशी तक्रार ग्रामस्थांनी जि.प. व पोलिसांकडे केली आहे.

जळगाव- वावडदा ता.जळगाव येथे ग्रामसेवक, ग्रा.पं.च्या सदस्यांनी खोटे दाखले व खोटे ठराव करून गावात देशी दारूचे दुकान उघडण्यास परवानगी दिली आहे. हे दारूचे दुकान गावात आले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्यास पोलीस प्रशासन व जि.प.तील संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, अशी तक्रार ग्रामस्थांनी जि.प. व पोलिसांकडे केली आहे.
त्याबाबत निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, २६ जानेवारी रोजी गावात ग्रामसभा झाली होती त्यात गावाचा विकास व म्हसावद सामूहिक पाणी योजनेतून गाव वगळण्याची चर्चा झाली. इतर कुठलेही विषय नव्हते. परंतु ग्रामसेवक व ग्रामपंचातीच्या कार्यकारिणीने संगनमत करून गावात किरकोळ देशी दारू विक्री करण्याचे दुकान आणण्याचा घाट रचला. तसा ठराव केेला. ठराव करताना गावात एकही देशी दारूचे दुकान नाही व देशी दारूचे दुकान आले तर महसूल वाढेल, असेही म्हटले आहे. ग्रामसभेसमोर तसा कुठलाही विषय झालेला नसताना खोटे नमूद करून ग्रा.पं.ने वावडदा ग्रामस्थांची फसवणूक केल्याचे निवेदनात म्हटले आहे. गावात देशी दारूचे दुकान सुरू झाले तर गावातील भावी पिढीचे नुकसान होईल. अनेकांना त्रास होईल व पुढे कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्नही निर्माण होईल, असेही म्हटले आहे. निवेदनावर राजेंद्र चव्हाण, किशोर पवार, गजानन न्हायदे, जितेंद्र रोजपूत, ईश्वर येवले, ज्ञानेश्वर गोपाळ, ज्ञानेश्वर पाटील, ईश्वर देवरे, रवींद्र गोपाळ आदी ४९ ग्रामस्थांच्या स‘ा आहेत.