ऑनलाइन लोकमत -
इस्तंबूल, दि. 07 - भारताची अनुभवी महिला मल्ल विनेश फोगटने पात्रता फेरीत विजय मिळवून रिओ ऑलिम्पिक 2016 मधील आपलं तिकीट पक्क केलं आहे. विनेश फोगटसोबत साक्षी मलिकनेदेखील ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला आहे. साक्षी मलिकने 58 किलो वजनी गटात तर 21 वर्षीय विनेश फोगटने 48 किलो वजनी गटात पात्र केलं आहे. भारताकडून प्रथमच दोन महिला मल्लांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवून इतिहास घडवला आहे. 2012 मध्ये गीता फोगटने ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवत पहिली महिला मल्ल होण्याचा मान मिळवला होता.
याअगोदर गेल्या महिन्यात विनेश फोगट हिचे निर्धारित वजनगटापेक्षा अधिक वजन भरल्यामुळे मंगोलियात पार पडणा-या विश्व ऑलिम्पिक पात्रता कुस्तीतून तिला बाद ठरविण्यात आले होते. ४८ किलो वजन गटात आखाड्यात उतरलेल्या विनेशचे वजन अन्य मल्लांच्या तुलनेत ४०० ग्रॅम अधिक होते. त्यामुळे तिला स्पर्धेतून बाद ठरविण्यात आले होते.
भारताकडून एकूण 6 कुस्तीपटूंनी रिओ ऑलिम्पिक 2016मध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये 4 पुरुष मल्ल असून 2 महिला मल्ल आहेत.