शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
3
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
4
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
5
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
6
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
7
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
8
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
9
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
10
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
11
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
12
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
13
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
14
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
15
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
16
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
17
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
18
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
19
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
20
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी

"आम्ही बजरंग बलीचे भक्त आहोत, बॅरिकेड्स तोडले नाहीत", विनेश फोगाटचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2023 8:04 PM

Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत.

brij Bhushan Singh । नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधातील आंदोलक पैलवानांची आखाड्याबाहेरील कुस्ती अद्याप सुरूच आहे. २३ एप्रिलपासून आंदोलक पैलवान दिल्लीतील जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. आंदोलकांच्या समर्थनासाठी शेतकऱ्यांनी देखील हजेरी लावली होती. या निदर्शनात बॅरिकेड्स तोडल्याची घटना उघडकीस आली होती. एवढेच नाही तर पंतप्रधान मोदींच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. पंजाबमधून आलेल्या शेतकऱ्यांनी ही घोषणाबाजी केल्याचे बोलले जात आहे. 

याबाबत पैलवान विनेश फोगाटने सांगितले की, आम्ही बजरंग बलीचे भक्त आहोत. एकही बॅरिकेड तोडला नाही. आमच्या लोकांनी घोषणा देखील दिल्या नाहीत. काही समाजकंटकांनी घोषणाबाजी केली. शेतकरी संघटना आमच्या पाठीशी असल्याचे फोगाटने स्पष्ट केले. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी सांगितले की, जंतरमंतरवर आंदोलकांना आवश्यक सुविधा दिल्या जात आहेत. सुरक्षेची दखल घेऊन ठिकठिकाणी तपासणी केली जात आहे. पोलिसांनीही सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. 

ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महिला पैलवानांचा लैंगिक छळ केला असून त्यांना अटक करावी ही मागणी पैलवानांची आहे. दिल्ली पोलिसांनी सिंह यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. मात्र, अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे पैलवानांचे म्हणणे आहे. जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला शेतकऱ्यांसह विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. 

आखाड्याबाहेरील 'कुस्ती'लक्षणीय बाब म्हणजे ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी २३ एप्रिल रोजी आंदोलनाचे हत्यार उपसले. आंदोलनाला दोन आठवडे उलटून गेले असून अद्याप भारतीय कुस्ती महासंघाविरोधात खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत. खरं तर ब्रिजभूषण यांनी केलेल्या दाव्यानुसार आता केवळ तीन पैलवान आंदोलनस्थळी आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Wrestlingकुस्तीVinesh Phogatविनेश फोगटNew Delhiनवी दिल्लीBJPभाजपाFarmerशेतकरी