शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

आलोकनाथविरोधात विनता नंदा यांची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 5:52 AM

न्यायासाठी नंदानीचे पंतप्रधानांना पत्र, चौकशीअंती गुन्ह्याचे पोलिसांचे आश्वासन

मुंबई : लेखिका विनता नंदा यांनी बुधवारी अभिनेते आलोकनाथ यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. चौकशीअंती आलोकनाथ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी विनता नंदा यांनी दिली.विनता नंदा यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक पोस्टद्वारे आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. ओशिवरा पोलिसांनी माझी तक्रार घेतली आहे. आता पुढील प्रक्रियेला सुरुवात होईल. मला मंगळवारी संध्याकाळी मानहानी प्रकरणी नोटीस मिळाली आहे. माझे वकील यासंदर्भात काम करीत आहेत. ते सध्या दिंडोशी न्यायालयात आहेत, अशी माहिती विनता नंदा यांनी दिली.दरम्यान, विनता नंदा यांनी आता या प्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियावर पत्र लिहीत लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या सर्व महिलांना मदत करण्याची विनंती केली आहे. भारत हा देश महिलांसाठी नाही, असे सगळे म्हणतात; या सगळ्यांना खोटे ठरवा. इथल्या प्रत्येक महिलेच्या पाठी तुम्ही खंबीरपणे उभे आहात हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे, अशी विनंती त्यांनी पत्रातून केली आहे.माझे शोषण होऊनही नवाजुद्दीन गप्प होता - चित्रांगदामीटू’च्या मोहिमेत अभिनेत्री चित्रांगदा सिंगही समोर आली आहे. २०१७ मध्ये ‘बाबूमोशाय बंदुकबाज’ सिनेमातून मी काढता पाय घेतला होता; कारण दिग्दर्शकाने कथानकात बदल करून ऐनवेळी मला नवाजुद्दीन सिद्दिकीसोबत बेड सीन करण्यास सांगितले. मला तो सीन करण्याची धमकी दिग्दर्शक आणि निर्मात्याने दिली होती. हा सगळा प्रकार नवाजुद्दीनच्या समोर सुरू होता. तो माझी बाजू घेईल, अशी मला अपेक्षा होती. पण तो काहीही बोलला नाही. त्यामुळे मी तो सिनेमा सोडला.

टॅग्स :Metoo Campaignमीटू