आयप्पा मंदिरातील महिलाप्रवेशाचा प्रचारात उल्लेख केल्यास आचारसंहितेचा भंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 06:41 AM2019-03-12T06:41:15+5:302019-03-12T06:41:39+5:30

केरळच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा राजकारण्यांना इशारा

The violation of the code of conduct as mentioned in the campaign of women's entry in Ayappa temple | आयप्पा मंदिरातील महिलाप्रवेशाचा प्रचारात उल्लेख केल्यास आचारसंहितेचा भंग

आयप्पा मंदिरातील महिलाप्रवेशाचा प्रचारात उल्लेख केल्यास आचारसंहितेचा भंग

Next

तिरुवनंतपुरम : शबरीमाला येथील आय्यप्पा मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्या मुद्द्याचा निवडणूक प्रचारात उल्लेख केल्यास तो आचारसंहितेचा भंग ठरेल असा इशारा केरळचे मुख्य निवडणूक अधिकारी टी. एन. मीना यांनी दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर निवडणूक प्रचारात टीकाटिप्पणी करणारा राजकीय पक्ष, पक्षनेता यांच्यावर कारवाई केली जाईल. अय्यप्पा मंदिरात महिलांना देण्यात आलेल्या प्रवेशाबाबत किंवा त्याच्यावरील निकालाबाबत केली जाणारी वक्तव्ये हा धार्मिक प्रचार समजला जाईल.

केरळमध्ये लोकसभेच्या २० जागा आहेत. निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात तिथे २३ एप्रिलला मतदान होणार आहे. अय्यपा मंदिरात महिलांना प्रवेश देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आव्हान याचिका दाखल करण्याचा केरळ देवस्थान मंडळाचा विचार होता. मात्र कालांतराने मतपरिवर्तन होऊन या मंडळाने न्यायालयाचा निकाल मान्य केला. त्यानंतरही १० ते ५० वर्षे वयोगटातील ज्या महिला अय्यप्पा मंदिरात जाऊ इच्छित होत्या त्यांना भक्तांकडून अडविण्याचे प्रकार घडत होते. मात्र २ जानेवारी रोजी पहाटे बिंदू अम्मिनी, कनकदूर्गा या दोन महिलांनी या मंदिरात प्रवेश करून इतिहास घडविला होता.

भाजपाला अप्रत्यक्ष तंबी
महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात केरळ भाजपाने राज्यभरात सातत्याने निदर्शने केली होती. अय्यपा मंदिरातील प्रथा, परंपरांचे या निकालामुळे उल्लंघन होणार आहे असा आक्षेप भाजपाने घेतला होता. तर मंदिरात महिलांना प्रवेश देण्यास राज्यातील डाव्या पक्षांचे आघाडी सरकार अनुकूल आहे. त्यामुळे या सरकारवर देखील भाजपाने आगपाखड केली होती. त्यामुळे आचारसंहितेचा कशाकशामुळे भंग होईल हे सांगत असतानाच केरळच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपाचे नाव न घेता त्या पक्षालाच तंबी दिली असल्याची चर्चा आहे.

Web Title: The violation of the code of conduct as mentioned in the campaign of women's entry in Ayappa temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.