शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला; ISF च्या कार्यकर्त्यांकडून पोलीस लक्ष्य; वाहने फोडून पेटवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 20:42 IST

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आला असून पोलिसांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

West Bengal Violence: पश्चिम बंगालमध्ये नवीन वक्फ कायद्याविरुद्ध पुन्हा हिंसक आंदोलन झाले. मुर्शिदाबादनंतर पश्चिम बंगालमधील आणखी एका जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आहे. सोमवारी दक्षिण २४ परगणा येथे इंडियन सेक्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट केली आणि  वाहनांची तोडफोड करत त्यांना आग लावली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना जमावाला पांगविण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. त्यामुळे आता परिसरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कायद्यासोबत कुणी खेळू नका म्हणत शांततेचे आवाहन केले आहे.

वक्फ दुरुस्ती कायद्याच्या विरोधात बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आला आहे. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात इंडियन सेक्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मोटारसायकली जाळल्या आणि पोलिस बस उलटवली. गेल्या आठवड्यात मुर्शिदाबादसह इतर जिल्ह्यांमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर तीन लोकांचा मृत्यू झाला होता आणि २०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली होती. मुस्लिमबहुल मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारात ट्रेनवर दगडफेक करण्यात आली. तसेच घरे आणि दुकाने पेटवून देण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी कडक पावले उचलत बळाचा वापर केला. त्यानंतर आता दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे.

भांगर परिसरात इंडियन सेक्युलर फ्रंटच्या समर्थकांची पोलिसांशी झटापट झाली. त्यात अनेक लोक जखमी झाले आणि पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या. आयएसएफ समर्थक मध्य कोलकात्यातील रामलीला मैदानाकडे जात होते. तिथे सर्वजण वक्फ कायद्याविरुद्धच्या रॅलीत सहभागी होणार होते. मात्र पोलिसांकून या रॅलीसाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती. तरीही मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरला होता. जमावाकडून बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये काही पोलिस जखमी झाले आहेत. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला, ज्यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला. 

कायद्याशी खेळू नका - ममता बॅनर्जी

दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोयला बैसाखीच्या निमित्ताने मुर्शिदाबाद हिंसाचाराबद्दल भाष्य केलं. "कायदा हातात घेणाऱ्यांना सोडले जाणार नाही. कोणत्याही लोकशाही समाजाचा पाया लोकांच्या आवाजावर आणि त्यांची मते ऐकून घेण्याच्या अधिकारावर अवलंबून असतो. लोकशाही पद्धतीने शांततेत निषेध करण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे, परंतु कायद्याचे उल्लंघन करण्याचा नाही," असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डwest bengalपश्चिम बंगालPoliceपोलिस