नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल दु:ख व्यक्त करताना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी त्यामुळे देशाच्या अंतरात्म्यावर आघात झाल्याची भावना व्यक्त केली. या हिंसेमुळे लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे.
राज्यातील जनतेला शांतता आणि सौहार्दाचे आवाहन करीत त्यांनी ईशान्येकडील लोक या संकटावर मात करतील, अशी आशा व्यक्त केली. दरम्यान, इंफाळ येथील थांगजियांग येथे मंगळवारी रात्री पावणेबारा वाजता पुन्हा गोळीबार झाला असून, इंटरनेट बंदी कायम आहे.
१ जुलैपर्यंत शाळा बंदराज्यातील परिस्थिती पाहता ४ मे पासून बंद पडलेल्या शाळांच्या सुट्या १ जुलैपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. यापूर्वी २१ जून रोजी शाळा सुरू करण्याची तयारी होती.
१०० पैकी १० एटीएममध्ये पैसेइंटरनेट सेवा बंद झाल्याने लोकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. एटीएममधून पैसे काढणेही अवघड झाले आहे. इंफाळमध्ये जवळपास १०० एटीएम आहेत, त्यापैकी फक्त ५ ते १० एटीएममध्ये पैसे आहेत. इंटरनेट बंद असल्याने खरेदी रोखीनेच करावी लागत आहे. त्यामुळे रोज एटीएममध्ये जावे लागते.