शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

हरयाणात हिंसाचार थांबेना; प्रदीप शर्मा हत्येप्रकरणी आप नेत्यासह १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 5:22 AM

- बलवंत तक्षक  लोकमत न्यूज नेटवर्क  चंडीगड : हरयाणातील नूह येथे झालेल्या हिंसाचारात बादशाहपूर येथील बजरंग दलाचे संयोजक प्रदीप शर्मा ...

- बलवंत तक्षक लोकमत न्यूज नेटवर्क चंडीगड : हरयाणातील नूह येथे झालेल्या हिंसाचारात बादशाहपूर येथील बजरंग दलाचे संयोजक प्रदीप शर्मा यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आम आदमी पार्टीचे (आप) नेते जावेद अहमद यांच्यासह सुमारे १५० जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.  दरम्यान,  हरयाणात हिंसाचार सुरूच असून, पानिपतमध्ये दुकानांची तोडफोड करण्यात आली.आपल्या तक्रारीत पवन याने म्हटले आहे की, जावेदने जमावाला सांगितले की, त्यांना मारा. जे होईल ते मी पाहून घेईन.

या हल्ल्यात प्रदीप यांना रॉड लागला आणि ते जखमी होऊन खाली पडले. गोळीबाराचा आवाज ऐकून पोलिस तेथे पोहोचले. प्रदीप यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. जावेद त्या दिवशी घटनास्थळी उपस्थित नव्हता, असे काही लोकांचे म्हणणे आहे. दरम्यान, नूहमध्ये अजूनही संचारबंदी आहे, सरकारने इंटरनेटसेवा, बल्क एसएमएस सेवा ८ ऑगस्टपर्यंत बंद ठेवल्या आहेत. 

दंगलीचे पाकिस्तानी कनेक्शन?n नूह दंगलीचे पाकिस्तानी कनेक्शनही समोर आले आहे. तपासादरम्यान, पोलिसांना पाकिस्तानी यूट्यूबर जीशान मुश्ताकची माहिती मिळाली आहे, ज्याने ‘अहसान मेवाती’ या नावाने सोशल मीडियावर आपले खाते तयार केले होते. त्याने नूह हिंसाचाराच्या वेळी प्रक्षोभक व्हिडीओ पोस्ट केले. n हे लोकेशन राजस्थानातील अलवरचे सांगितले जाते. मात्र, हे व्हिडीओ पाकच्या इस्लामाबाद, लाहोर येथून अपलोड करण्यात आले होते. मोनू मानेसरला मारणे आणि नूह येथील हिंसाचाराला जीशाननेच प्रवृत्त केले होते. पोलिसांनी जीशानविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे.

बिट्टू बजरंगीला अटक नूह येथे हिंसाचार भडकविल्याच्या आरोपावरून पोलिसांनी गोरक्षक बिट्टू बजरंगीला अटक केली आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी बजरंगीविरुद्ध फरिदाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अटक झाल्यानंतर, लगेचच बजरंगीला जामिनावर सोडण्यात आले होते. 

खट्टर, विज यांच्यात तणाव हिंसाचारानंतर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि गृहमंत्री अनिल विज यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे. नूह दंगलीसंदर्भात कोणताही प्रश्न विचारला असता, विज यांनी स्पष्टपणे सांगितले की, तुम्हाला जे विचारायचे आहे, ते मुख्यमंत्र्यांनाच विचारा. त्यांच्याकडे सर्व माहिती आहे. 

पानिपतमध्ये दुकानांची तोडफोड हरयाणाच्या पानिपतमध्ये रविवारी चेहरा झाकून दुचाकीवरून आलेल्या पुरुषांच्या गटाने दोन ठिकाणी काही दुकानांची तोडफोड केली. यात काही लोक जखमी झाले. यासंदर्भात १५ जणांना ताब्यात घेण्यात आहे.

आमदाराची सुरक्षा काढून घेतलीहिंसाचारानंतर खट्टर सरकारने फिरोजपूर-झिरका येथील काँग्रेस आमदार मामन खान यांची सुरक्षा काढून घेतली आहे. नूह येथील हिंसाचारात खान यांचेही नाव जोडले जात आहे. नूह येथील हिंसाचारासाठी मामन खान यांच्या विधानसभेतील भाषणाला जबाबदार धरले जात आहे.

टॅग्स :Haryanaहरयाणा