मणिपूरच्या हिंसाचाराचे जोरदार पडसाद मिझोराममध्येही उमटले होते. त्याचे परिणाम निवडणुकीवरही होण्याची शक्यता आहे. मणिपूरच्या मैतेई समाजाने इतर राज्यांत प्रामुख्याने आसाम, मिझोराममध्ये आश्रय घेतला होता.
मिझोराम विधानसभेत केवळ ४० सदस्य आहेत. २०१८ मध्ये २६ जागा मिळवलेल्या मिझो नॅशनल फ्रंटची (एमएनएफ) इथे सत्ता आली. गतवेळेस सत्तेत असलेल्या काँग्रेसकडे केवळ ५ आमदार होते तर भाजपकडे केवळ १ आमदार आहे. एमएनएफ पक्ष भाजपप्रणित एनडीएचा घटक असला तरी या खेपेला भाजपने स्वबळावर सत्ता आणण्याची तयारी चालवली आहे. भाजप १५ ते २० जागांवर उमेदवार उतरविण्याच्या तयारीत आहे.
विद्यमान मुख्यमंत्री झोरमथंगा यांच्या नेतृत्वाखाली एमएनएफ ही निवडणूक लढवित आहे. काँग्रेसने पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. प्रदेशाध्यक्ष लालसावता यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत घेतले जाते.
२०१८चे निकालएमएनएफ २६ काँग्रेस ५ भाजप १ अपक्ष ८एकूण जागा ४०