आगरतळा - त्रिपुरामध्ये निवडणुकीनंतर काही भागात हिंसाचार भडकला आहे. त्रिपुराची राजधानी अगरतलाजवळील बांग्लादेश सीमेलगतच्या भागात सोमवारी रात्री हिंसाचार भडकला. पश्चिम त्रिपुरा प्रशासनाने या भागात वाढता हिंसाचार पाहता कलम १४४ लागू केली आहे. पश्चिम त्रिपुराचे जिल्हाधिकारी मिलिंद रामटेके यांनी हिंसाचार रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. निकालानंतर मार्क्सवादी नेत्यांची कार्यालये व घरांवर हल्ला करण्यात आला आहे.
निवडणुकीनंतर त्रिपुरात काही भागात हिंसाचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:55 IST