नवी दिल्ली - चित्रपटाला विरोध असेल तर कायदेशीर मार्गाने विरोध करा, हिंसक कारवाया करणं, धमकं देणं स्वीकारलं जाणार नाही अशा वाक्यात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी चिथावणीखोरांना फटकारलं आहे. एका कार्यक्रमात नायडू यांनी नोटाबंदी ते पद्मावती अशा सगळ्या विषयांवर चर्चा केली आणि परखड मते व्यक्त केली.
काही जणांनी पद्मावतीच्या कलाकारांविरोधात धमक्या दिल्या तसेच त्यांना मारहाण केल्यास इनाम जाहीर केली आहेत. त्यांची खिल्ली उडवताना नायडू म्हणाले की अशांकडे इतके पैसे तरी असतील की नाही शंका आहे. एक कोटी रुपये म्हणजे काय चेष्टा आहे का, असे सांगत प्रत्येकजण अशी इनामं जाहीर करत असल्याचं ते म्हणाले.
'या' सहा मुख्यमंत्र्यांनी पद्मावती सिनेमावर उघडपणे व्यक्त केलं मत
लोकशाहीमध्ये अशा गोष्टींना थारा नसल्याचं नायडू म्हणाले असून जर कुणाच्या चित्रपटांमुळे भावना दुखावल्या असतील तर त्यांनी लोकशाही मार्गाने दाद मागावी असं नायडू म्हणाले. विशेष म्हणजे भाजपाच्याच अनेक सत्ताधारी नेत्यांनी पद्मावती चित्रपटाच्या निर्माते कलाकारांविषयी हिंसक भाषा वापरली आहे. अर्थात, एखाद्या विशिष्ट सिनेमाविषयी आपण बोलत नसून सगळ्याच बाबतीत हे लागू असल्याचं ते म्हणाले.
कोण होती पद्मावती ? जाणून घ्या का सुरु आहे वाद ?
लोकशाहीमध्ये चर्चेला महत्त्व असून वाद विवाद व्हायला हवेत आणि असहमतीचा अधिकार प्रत्येकाला असल्याबद्दल सर्वसहमती असायला हवी अशी अपेक्षा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली. मातृभाषेचं महत्त्वही व्यंकय्या नायडूंनी यावेळी अधोरेखीत केलं. मातृभाषेचा आदर करायला हवा असं सांगताना, प्रत्येक मुलांनी आपली भाषा सिकायलाच हवी असं आग्रही प्रतिपादन त्यांनी केलं. आई, मातृभूमी, मातृभाषा, जन्मभूमी आणि महिलांचा सन्मान या पाच गोष्टी अत्यावश्यक असल्याचं नायडू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले.