नवी दिल्ली- पुलवामा हल्ल्यात भारतमातेच्या 40 जवानांना वीरमरण आलं. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यासंदर्भात सोशल मीडियावरही बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसंदर्भात अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये राहुल गांधी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत असताना दिसत आहेत.विशेष म्हणजे अभिनेते आणि खासदार परेश रावल यांनीही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत असतानाच राहुल गांधी फोनवर बोलत असल्याचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक मजकूरही लिहिला आहे. राहुल गांधी शहिदांना योग्य सन्मान देऊ शकत नाहीत. एकीकडे पूर्ण देश शहीद जवानांसाठी अश्रू ढाळत आहेत आणि राहुल गांधी श्रद्धांजली देण्याऐवजी फोनवर बिझी आहेत. Bharat Positive या फेसबुक पेजवरून राहुल गांधी श्रद्धांजली वाहत असतानाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्येही राहुल गांधी राहुल गांधी फोनवर बिझी असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत 15 हजारांहून अधिक लोकांनी शेअर केलं आहे. तसेच 3 लाखांहून अधिक युजर्सनं हा व्हिडीओ पाहिला आहे.
व्हायरल सत्यः शहिदांना श्रद्धांजली वाहताना राहुल गांधी खरंच मोबाइलमध्ये बिझी होते?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 12:23 PM