शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
5
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
6
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
7
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
8
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
9
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
10
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
11
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
12
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
13
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
14
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
15
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
16
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
17
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
18
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
19
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका

Video : नाल्यात उडी, मग दुधाने आंघोळ; AAP च्या 'नायक' नगरसेवकाला पाहून आठवला अनिल कपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 9:23 AM

Delhi MCD Election Latest News:  जेव्हा AAP नगरसेवक हासिब अल हसन नाल्याची सफाई करण्यासाठी निघाले तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित लोकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली. 

दिल्लीत महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणाचे वेगवेगळे रंग पाहायला मिळत आहेत. एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी दिल्लीतील एमसीडी युनिफिकेशन विधेयकाला मंजुरी दिली दिली. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचे (AAP) नगरसेवक हसीब अल हसन बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरच्या शैलीत दिसले. हसीब अल हसन यांनी पूर्व दिल्लीतील एका नाल्यात उडी मारली आणि तो नाला साफ केला. त्यानंतर लोकांनी त्यांना दुधाने आंघोळ घातली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जेव्हा आपचे नगरसेवक हासिब अल हसन हे नाल्याची सफाई करण्यासाठी निघाले तेव्हा अनेकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. तसंच यानंतर त्यांनी नाल्यात उडी घेतली. त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित लोकांनी त्यांना दुधानं आंघोळ घातली. आपच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाविरोधातही मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. गेल्या निवडणुकांमधून धडा घेत यावेळी आप एमसीडी निवडणुकांमध्ये कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. त्यामुळेच आप आता जोरदार तयारीत लागली आहे. तसंच पक्षानं भाजपला घेरण्याची कोणतीही संधी सोडलेली नाही. आप कडून एमसीडी निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलण्याचा आरोप करत आहे. मंगळवारीही आपनं दिल्लीत एमसीडी निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तसंच एमसीडी निवडणुका वेळेतच घेण्यात याव्या अशी विनंतीही त्यांनी केली.  तिन्ही पालिका होणार एकत्रदरम्यान, दिल्लीतील तिन्ही पालिका मिळून एक करण्याच्या विधेयकावर मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं. आता याच आठवड्यात हे विधेयक संसदेत आणलं जाऊ शकतं. तसंच हे विधेयक मंजूर झाल्यानंतर तिन्ही पालिकांसाठी मिळून एकच महापौर असणार आहे. तसंच नॉर्थ, ईस्ट आणि साऊथ यांच्या ऐवजी एकच पालिका असेल. मार्च महिन्यातच दिल्लीत पालिकेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची अपेक्षा होती. परंतु अद्यापही ती झालेली नाही.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाdelhiदिल्लीAAPआपElectionनिवडणूक