कोरोना व्हायरसच्या संकटात देशात लॉकडाऊन कायम आहे. पण, आमदारानंच लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केलं आहे. बिहार येथील बक्सरच्या ब्रह्मपुर विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रीय जनता दलाचे ( RJD) आमदार शंभूनथ यादव यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करताना एका क्रिकेट स्पर्धेचं उद्धाटन केलं. उद्धाटनासाठी त्यांनी फलंदाजीही केली. पण, फटका मारण्याच्या नादात आमदाराचा फुटबॉल झाला. ( RJD MLA play cricket during lockdown in Bihar; FIR lodged )
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदाराच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आमदारासह स्पर्धा आयोजकांवर FIR नोंदवला गेला आहे. या उद्धाटन सोहळ्याला लोकांनीही प्रचंड गर्दी केली होती. तेव्हा त्यांनी पहिला चेंडू जोरदार टोलवला. त्यानंतर त्यांचा उत्साह आणखी वाढला आणि दुसरा फटका मारण्यासाठी सज्ज झाले. पण दुसऱ्यांदा फटका मारताना त्यांचा पाय घसरला अन् ते चांगलेच आपटले. समर्थक आणि बॉडिगार्ड्सनी त्यांना उचलले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आमदारासह 25 जणांवर FIR नोंदवला गेला. ( RJD MLA play cricket during lockdown in Bihar; FIR lodged )
पाहा व्हिडीओ...
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 46 लाख 46,707 इतकी झाली आहे. त्यापैकी 87 लाख 37,835 रुग्ण बरे झाले असले तरी 6 लाख 08,978 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 11 लाख 19,307 इतका झाला असून 27,514 जणांचं निधन झालं आहे. 7 लाख रुग्ण बरेही झाले आहेत. ( RJD MLA play cricket during lockdown in Bihar; FIR lodged )
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कोरोनामुळे खेळाडूंवर आली उपासमारीची वेळ; दूध खरेदी करण्यासाठीही नाहीत पैसे!
WiFi दुरुस्तीसाठी भारतीय क्रिकेटपटूच्या घरी थेट 'NASA'वरून आला व्यक्ती!
IPL 2020 च्या मार्गात आणखी एक विघ्न; BCCIने ठरवलेल्या तारखांवर ब्रॉडकास्टर नाराज, पण का?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या वडिलांना झाला कोरोना; आईच्या रिपोर्टची प्रतीक्षा
भारतामुळे शोएब मलिकचा इंग्लंड दौरा लांबणीवर; पाकिस्तान क्रिकेट मंडळाचं ट्विट