नवी दिल्ली : जागतिक दर्जाचा फलंदाज विराट कोहली याला नुकताच इंडियन ऑफ दि इयर हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. दिल्लीत पार पडलेल्या एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेच्या सोहळ्यात विराटला हा पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच विश्वसुंदरी मानुषी छिल्लर हिलाही या कार्यक्रमात स्पेशल अचिव्हमेंटचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
त्याच्यासोबत विविध क्षेत्रात नामवंत ठरलेल्या अनेक मान्यवरांनाही या सोहळ्यात गौरवण्यात आले आहे. अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु, भाजपचे दिल्ली अध्यक्ष मनोज तिवारी, क्रिकेटचे माजी कप्तान क्रिष्णमचारी श्रीकांत, कपिल देव आदी दिग्गजांनी या पुरस्कार सोहळ्यात उपस्थिती दाखवली होती.
मानुषीने विचारलेल्या प्रश्नावर सडेतोड उत्तर दिलेल्या विराट कोहलीमुळे हा कार्यक्रम आणखी रंगला. व्यासपीठावरील या दोघांच्या संवाद-चर्चेमुळे या कार्यक्रमाला चार-चाँद लाभले.
व्यवसाय, मनोरंजन, खेळ, पब्लिक सर्व्हिस अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरवण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यात अनेक मान्यवरांनीही उपस्थिती दाखवली होती.
पब्लिक सर्व्हिस या क्षेत्रात अफ्रोज शहा यांना हा पुरस्कार केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते देण्यात आला. अफ्रोज शहा यांनी मुंबईतील वर्सोवा बीचवर ७ मिलिअन टन कचरा स्वच्छ केला होता. त्यांची दखल घेत युएन ग्रीन अॅवॉर्डही मिळाला आहे.
स्पोर्ट्स क्षेत्रासाठी किदांबी श्रीकांत यांना गौरवण्यात आलं आहे. बॅडमिंटन खेळातील त्याच्या कामगिरीबद्दल सुरेश प्रभू यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं.
सगळ्यांच्या पसंतीस उतरलेला बाहुबली या चित्रपटालाही या पुरस्कार सोहळ्यात गौरवण्यात आलं. आऊटस्टँडिंग अचिव्हमेंट म्हणून बाहुबलीच्या टीमला गौरवलं गेलं. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते बाहुबली टीमचं कौतुक केलं गेलं. तसंच मनोरंजन क्षेत्रातलं वैयक्तिक पारितोषिक राजकुमार राव या अभिनेत्याला मिळालं.
भाजपचे दिल्लीतील अध्यक्ष मनोज तिवारी यांच्या हस्ते राजकुमार राव याला गौरवण्यात आलं. व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे अदार पुनावाला यांनाही गौरवण्यात आलं. भारताच्या फार्मा कंपनीला एका मोठ्या उंचीवर नेल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
व्यावसायिक क्षेत्रात आचार्य बालक्रिष्णन यांना गौरवण्यात आलं. पतंजलीसारख्या देशी पदार्थांना त्यांनी देशभर मार्केट उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना गौरवण्यात आलं आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भारतीय महिला क्रिकेट संघाने या वर्षी खूप मोलाची कामगिरी केली. त्यांच्या या यशामळे संपूर्ण देशाची मान उंचावली गेली. म्हणूनच ग्रुप स्पेशल अचिव्हमेंट म्हणून त्यांना या सोहळ्यात गौरवण्यात आलं.
आणखी वाचा - मानुषी आणि विराटची एका मंचावर खास भेट , दोघांच्या फोटोला नेटिझन्सनी घेतलंय डोक्यावर
भारताचे माजी कॅप्टन क्रिष्णमचारी श्रीकांत, कपिल देव आणि अरुण जेटली यांच्याहस्ते महिला क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांनी हा पुरस्कार स्विकारला.
तसंच, सध्याचे भारतीय क्रिकेट टीमचे कोच रवि शास्त्री यांनाही पुरस्कार देण्यात आला. अरुण जेटली, विराट कोहली आणि कपिल देव यांच्या हस्ते रवि शास्त्री यांना गौरवण्यात आलं.
तब्बल १७ वर्षांनी भारतात मिस वर्ल्डचा किताब आणणारी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर हिला स्पेशल अचिव्हमेंट अॅवॉर्ड मिळाला आहे तर, सगळ्यांचाच चाहता असलेल्या विराट कोहलीला जिओ पॉप्यूलर चॉईस फॉर इंडियन ऑफ दि इयर आणि इंडियन ऑफ दि इयर असे दोन पुरस्कार मिळाले आहे.
सौजन्य - www.news18.com