ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - बीएसएफचे जवान तेज बहादूर यादव यांच्या व्हायरल झालेल्या कथित व्हिडीओमुळे देशात खळबळ उडाली आहे. सीमारेषेवर जवानांच्या होणा-या गैरसोयीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या व्हिडीओच्या माध्यमातून करण्यात आला आहे. दरम्यान, क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग आणि कुस्तीपटू योगेश्वर दत्तने या जवानाचे समर्थन केले आहे.
सीमारेषेवर तैनात असणा-या जवानांसाठी सरकारतर्फे येणारे धान्य अधिकारी बाजारात विकतात आणि जवानांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते, असे सांगत तेज बहादूर यादव यांनी अधिका-यांवर घोटाळ्याचे आरोप या व्हिडीओतून केला आहे.
यावर वीरेंद्र सेहवागने नाराजी व्यक्त करत जवानाचे समर्थन करणारे ट्विट केले आहे. 'आपल्या सैनिक आणि शेतकऱ्यांची देखभाल करणे गरजेचे आहे. जवानांच्या खाण्याची योग्य व्यवस्था झाली पाहिजे.’असे ट्विट वीरेंद्रने केले आहे.
'ऊन असो वा पाऊस वा बर्फाचा तेज मारा, कोणत्याही परिस्थिती आम्ही सीमेवर 12-12 तास उभं राहून डोळ्यात तेल घालून पहारा देतो. आम्ही आमचे कर्तव्य चोखपणे बजावत असतानाच आम्हाला धड पुरेसे खायलाही मिळत नाही' अशी खंत बीएसएफचे जवान तेज बहादूर यादव यांनी व्हिडीओतून मांडताना अधिका-यांकडून कशी वाईट वागणूक मिळते, याचा पाढाही वाचला.
केवळ वीरेंद्र सेहवागनंच नाही तर कुस्तीपटू योगेश्वर दत्तनेही तेज बहादूर यादव यांचे समर्थन केले आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी या जवानाला पाठिंबा दर्शवत त्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान, जवानाच्या व्हायरल व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली असून गृहमंत्रालयाने यासंबंधी अहवाल सादर करायला सांगितला आहे.
रक्षको की दुर्दशा।सीमा पर 1 रोटी से duty और peace posting में मैडम के शॉपिंग बैग उठाओ।#saveBSF BSF Jawan Posted in J https://t.co/gLf6P1PCjz— Yogeshwar Dutt (@DuttYogi) 10 January 2017
Whatever said and done,our Soldiers and Farmers need to be taken better care of. Proper food needs to reach them all.#Food4Soldierspic.twitter.com/5WG9btYabs— Virender Sehwag (@virendersehwag) 10 January 2017