शहरं
Join us  
Trending Stories
1
हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...
2
"संजय राऊत आणि आमच्यात वाद नाही, पण..." नाना पटोले यांनी स्पष्ट केली भूमिका
3
एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची
4
रशिया युद्धात उत्तर कोरियाही, पाठविले १२ हजार सैनिक; दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेचा दावा
5
भारताची 'युवासेना' आज पाकिस्तानशी भिडणार; टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार? जाणून घ्या सर्वकाही
6
नारायण मूर्तींनी टाटांचा दयाळू उद्योजक म्हणून केला उल्लेख; सांगितला १९९९ चा 'तो' किस्सा
7
जिंकलंस भावा! टीम इंडिया अडचणीत असताना मुंबईकर Sarfaraz Khan नं ठोकली सेंच्युरी
8
IPO पूर्वीच NSDL नं रचला इतिहास; भारत, जपान, जर्मनीच्या GDP पेक्षा अधिक झाल्या सिक्युरिटीज
9
घासून निघालेल्या जागांचे काय? पाच हजार मताधिक्यांच्या आतील ३७ मतदारसंघांचे निकाल ठरणार अधिक महत्त्वाचे
10
सायकलस्वाराला वाचवताना भीषण अपघात, ५३ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली नदीत
11
"विलेपार्लेची जागा शिंदेगटाला सोडा", माजी मंत्री दीपक सावंत यांनी घेतली जे. पी. नड्डा यांची भेट
12
ESIC बाबत सरकारचा मोठा निर्णय, PMJAY सोबत आणण्यास मंजुरी, कोणाला होणार फायदा?
13
आचारसंहितेमुळे योजनादूतांमार्फत प्रचार थांबवा; आयोगाची सूचना 
14
Rishabh Pant चुकला; त्याची विकेट वाचवण्यासाठी Sarfaraz Khan उड्या मारत ओरडताना दिसला
15
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे नेते"; पटोलेंच्या विधानावर राऊत म्हणाले, "त्यांच्या परवानगी शिवाय..."
16
पवार, फडणवीस यांच्या भेटीसाठी इच्छुकांची तोबा गर्दी
17
भारताने पाकिस्तानात खेळावे, रहायला खुशाल भारतात जावे; व्याकुळलेल्या शेजाऱ्याचा चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी पुन्हा नवा फॉर्म्युला
18
मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!
19
बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ, देशाच्या या भागात निर्माण होणार पूरस्थिती 
20
मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार

वर्ल्डकपसाठी येणाऱ्या पाक नागरिकांसाठी व्हिसा नियम शिथिल

By admin | Published: March 12, 2016 3:03 AM

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे सामने पाहण्यासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेट शौकिनांकरिता भारताने आपले व्हिसाचे नियम शिथिल केले आहेत.

नवी दिल्ली : आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे सामने पाहण्यासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेट शौकिनांकरिता भारताने आपले व्हिसाचे नियम शिथिल केले आहेत. पाकिस्तानमधून भारतात क्रि केट सामने पाहण्यासाठी येणाऱ्यांना आता अर्जासोबत आपल्या परतीच्या विमान प्रवासाचे तिकीट जोडावे लागणार नाही. शिवाय ६५ वर्षांपेक्षा अधिक आणि १५ वर्षांहून कमी वयाच्या पाकिस्तानी नागरिकांना पोलीस ठाण्यात सूचना देण्यापासून सूट देण्यात आली आहे.आगामी टी-२० वर्ल्ड कपसाठी येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना जवळपास १००० व्हिसा जारी केले जाण्याची शक्यता आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने बघण्यासाठी सर्वाधिक प्रेक्षक पाकिस्तानमधून येतील, असा अंदाज आहे. ‘व्हिसा जारी करण्यासाठी आम्ही २०१२ चे नियम पाळत असलो, तरी यावेळी परतीच्या विमान तिकिटाचा पुरावा सादर करण्याचा आग्रह धरला जाणार नाही. असा पुरावा देणे गैरसोयीचे असल्याचे काही पाकिस्तानी नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे व्हिसा मिळविण्यासाठी आता फक्त भारतात येतानाचे विमान तिकीट आणि अर्जदाराच्या नावावर जारी केलेले क्रिकेट सामन्याचे तिकीट तसेच हॉटेलमधील आरक्षणाची पावती जोडावी लागेल,’ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियममध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यासाठी येणाऱ्या पाीकस्तानी नागरिकांना सुरक्षा दिली जाईल, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही स्पष्ट केले आहे. अधिकाऱ्याने हेही स्पष्ट केले आहे की, ६५ वर्षांवरील आणि १५ वर्षांखालील पाकिस्तानी नागरिकांना भारतातील क्रिकेट सामन्याच्या स्थळी उतरल्यानंतर पोलिसांना वर्दी देण्याचीही गरज पडणार नाही.(लोकमत न्यूज नेटवर्क)