येवला : महिलांवर होणार्या शारीरिक आणि मानसिक छळाला आळा घालण्यासाठी व त्यांना संरक्षण मिळावे, यासाठी सवार्ेच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली येवला शहर पोलीस ठाण्यात विशाखा समितीची स्थापना करण्यात आली.येवला शहर व तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात नोकरी करणार्या महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी होणार्या लैंगिक छळ व इतर अडचणींसंदर्भात येवला शहर पोलीस ठाण्यात शहर पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सायंकाळी सुमारे तासभर बैठक झाली. शाळेतील काही खोडकर विद्यार्थी तसेच रोडरोमियो यांच्याकडून विद्यार्थिनींना व छेडछाड व असामाजिक कृत्यास वारंवार सामोरे जावे लागण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. परंतु अशा प्रकाराबाबत विद्यार्थिनी घाबरून संबंधिताविरोधात कोणतीही तक्र ार न करता निमुटपणे हा त्रास सहन करतात. अशा प्रकारच्या तक्र ारींचे निवारण करण्यासाठी येवला शहर पोलीस ठाण्यात महिला तक्र ार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली. याबाबत पीडित महिलांनी या कक्षाशी संपर्कसाधण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. या प्रकारात तक्र ार करणार्या महिलेचे अथवा विद्यार्थिनीचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे हे या समितीचे अध्यक्ष असून, नायब तहसीलदार पूनम दंडिले, पोलीस उप निरीक्षक सुनीता महाजन, पोलीस हवालदार अभिमन्यू अहेर, वैशाली आल्हाट, गीता शिंदे, दीपाली मोरे, मोसिना शेख आदि सदस्यांचाही या समितीत समावेश आहे. या बैठकीस वीणा पराते, लता लिमजे, शुभांगी खाखरिया, आसावरी जोशी, यांच्यासह महिलांनी चर्चेत सहभाग घेतला होता.(वार्ताहर)
येवला शहर पोलीस ठाण्यात विशाखा समिती स्थापन
By admin | Published: December 08, 2015 12:00 AM