Congress On Vishwakarma Scheme: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विश्वकर्मा जयंतीनिमित्त 'पीएम विश्वकर्मा' योजनेची सुरुवात केली. या योजनेवर काँग्रेस नेत्याने सडकून टीका केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना 'चुनावी जुमला' म्हटले आहे.
जयराम रमेश यांनी रविवारी (17 सप्टेंबर) X वर पोस्ट केली की, 'नोटबंदी, जीएसटी आणि त्यानंतर कोविड-19 दरम्यान अचानक लॉकडाऊन, हे भारतातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी सर्वात विनाशकारी ठरले. यापैकी बहुतांश लहान व्यवसाय हाताने काम करणारे लोक चालवतात. मोदी सरकारच्या धोरणांचा फटका बसलेले अनेकजण भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या संपर्कात आले आणि त्यांच्याशी जोडले गेले.'
निवृत्तीची वेळ आली'पंतप्रधानांनी या सर्वांची रोजीरोटी उद्ध्वस्त केली, त्यांचा नाश केल्यानंतर पंतप्रधानांना त्यांच्या संतापाची जाणीव झाली. त्यांचा असंतोष पाहून ही नवीन विश्वकर्मा योजना आणली. पण, ही फक्त एक चुनावी जुमला आहे. मात्र, मोदी जात जनगणनेच्या मुद्द्यावर काहीच बोलत नाहीत. त्यांचा मित्र गौतम अदानी यांच्या मुंबईस्थित धारावीचा ताबा घेण्यासही ब्रेक लावणार नाही. जनतेची पुन्हा फसवणूक होणार नाही. आता पंतप्रधानांच्या निवृत्तीची वेळ आली आहे,' अशी टीका जयराम रमेश यांनी केली.