जनता हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची बेकरीला भेट
By admin | Published: February 14, 2015 11:50 PM
बार्देस : मुलांना प्रत्यक्ष बेकरी प्रकाराचा अनुभव समजविण्याच्या उद्देशाने जनता हायस्कूलच्या प्राथमिक विभागाच्या दुसरी व तिसरीच्या मुलांनी म्हापसा येथील पेडणेकर यांच्या शांतादुर्गा बेकरीला भेट दिली. शिक्षिका भावना परब यांनी मुलांना सविस्तर बेकरीची माहिती सांगितली.
बार्देस : मुलांना प्रत्यक्ष बेकरी प्रकाराचा अनुभव समजविण्याच्या उद्देशाने जनता हायस्कूलच्या प्राथमिक विभागाच्या दुसरी व तिसरीच्या मुलांनी म्हापसा येथील पेडणेकर यांच्या शांतादुर्गा बेकरीला भेट दिली. शिक्षिका भावना परब यांनी मुलांना सविस्तर बेकरीची माहिती सांगितली. मुलांनी पीठ मळणे, पाव करणे, भाजणे प्रकार समजूण घेतला. तसेच इष्ट प्रकाराचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. मुलांनी कुतूहल पोटी बेकरीवाल्यांना प्रश्न विचारून माहिती करून घेतली. मुलांना शाळेत बेकरीवाला कामिल पाठ शिकविण्यात आला. त्या अनुषंगाने मुलांनी बेकरीला भेट दिली होती. या वेळी शिक्षिका भावना परब, सोनाली परब, दत्ता शिरोडकर व विनायक दिवकर होते. (प्रतिनिधी) फोटो : शांतादुर्गा बेकरीला जनता हायस्कूलच्या प्राथमिक विद्यालयाने भेट दिली. (प्रकाश धुमाळ) १४०२-एमएपी-०१