ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली , दि. १९ - ट्विटर वा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस्दवारे मांडलेल्या समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्यात केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आघाडीवर असून यावेळी सुषमा स्वराज यांच्यामुळे एका ५ महिन्यांच्या बालकाची त्याच्या वडिलांशी भेट झाली आहे.
सौदी अरेबियातील भारतीय कामगार, व इतर नागरिकांचे व्हिसा प्रॉब्लेम्स सोडवत सुषमा स्वराज यांनी त्यांना दिलासा दिला. त्या सर्वांनीच त्यांचे आभार मानले. मात्र त्यामध्ये एका पाच महिन्यांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे.
लिम्बो येथे पासपोर्ट असल्याने अली हे पाच महिन्यांचे बाळ
मूळचे काश्मिरी असलेले मात्र आता सिंगापूरमध्ये स्थायिक झालेले अरिफ रशीद झारगार यांनी आपल्या मुलाच्या पासपोर्टसाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली होती. अरिफ रशीद यांच्या पाच महिन्यांचा मुलगा अली याचा पासपोर्ट लिम्बो येथे असल्याने ते आपल्या मुलाला भेटूच शकत नव्हते. महिनाभर होऊनही पोलिस व्हेरिफिकेशन न झाल्याने त्रस्त झालेल्या आरिफ रशिद यांनी ट्विटरवरून ११ ऑगस्ट रोजी सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. मात्र स्वराज यांच्याकडून त्यांना काही उत्तर आले नाही. त्यानंतर रशीद यांनी १३ ऑगस्ट रोजी स्वराज यांना उद्देशून ट्विट करत मदत मागितली. 'माझ्या मुलाच्या पासपोर्टसाठी कृपया मदत करा अन्यथा व्हॉट्सअॅप व स्काईप ( वरून संवाद साधणारे) हेच त्याचे बाबा आहे, अशीच त्याची समजूत होईल', असे भावनाप्रधान ट्विट रशीद यांनी केले.
Ohh ! That will be too much, pl give me the details. @Gen_VKSingh@CPVIndia@passportsevameahttps://t.co/IgGaCAE5n1— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) August 18, 2016
त्यावर स्वराज यांनी तत्काळ उत्तर देत त्यांच्याकडे यांसबंधीचे डिटेल्स मागितले. व त्यानंतर अवघ्या एका दिवसात पासपोर्ट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पार पडली आणि काही दिवसांतच अलीची त्याच्या बाबांची भेट झाली. स्वराज यांच्या मदतीमुले भारावलेल्या रशीद यांनी पाच महिन्यांच्या अलीचा फोटो ट्विट करून त्याच्यातर्फेही स्वराज यांचे आभार मानले.
@SushmaSwaraj@Gen_VKSingh@CPVIndia@passportsevamea Baby Ali says thank you :) pic.twitter.com/pNf5DAXW1w— Arif Rashid Zargar (@arifzargar) August 18, 2016
आणखी वाचा :
(एकटाच हनीमूनला गेलेल्या पतीच्या मदतीस धावल्या सुषमा स्वराज)
(अजब ! फ्रिज खराब झाला म्हणून केलं सुषमा स्वराज यांना ट्विट)