शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

हरमल प्राप्ती फेडरेशनची आश्रमाला भेट

By admin | Published: March 11, 2016 10:26 PM

हरमल प्राप्ती महिला फेडरेशनची महिलाश्रमाला भेट मांद्रे : महिला दिनाचे औचित्य साधून हरमल येथील प्राप्ती महिला फेडरेशनच्या शिष्टमंडळाने शिवोली येथील सेंट मेरी होम फॉर एज या महिला वृद्धाश्रमाला भेट दिली. फेडरेशनचे अध्यक्ष नारायण रेडकर यांच्या अध्यक्षतेखाली फेडरेशनच्या सदस्यांनी शनिवार दि. ५ रोजी महिला वृद्धाश्रमाला भेट देऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली ...


हरमल प्राप्ती महिला फेडरेशनची महिलाश्रमाला भेट
मांद्रे : महिला दिनाचे औचित्य साधून हरमल येथील प्राप्ती महिला फेडरेशनच्या शिष्टमंडळाने शिवोली येथील सेंट मेरी होम फॉर एज या महिला वृद्धाश्रमाला भेट दिली.
फेडरेशनचे अध्यक्ष नारायण रेडकर यांच्या अध्यक्षतेखाली फेडरेशनच्या सदस्यांनी शनिवार दि. ५ रोजी महिला वृद्धाश्रमाला भेट देऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली व त्यांना अन्नपदार्थ पुरविण्यात आले. यावेळी फेडरेशनच्या शिष्टमंळात फेडरेशनच्या उपाध्यक्षा स्नेहा कान्होजी, निमंत्रक सिस्टर आवेलिना, सहसचिव नविता ठाकूर उपस्थित होत्या. यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष नारायण रेडकर व सिस्टर आवेलिना यांनी वृद्धाश्रमातील वृद्ध महिलांकडे हिजगूज साधले. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या वृद्धापकाळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. एकूण २१ वृद्ध महिला या सेंट मेरी होम फॉर एज आश्रमात आपला वृद्धापकाळ घालवत आहेत. यावेळी प्रत्येक वृद्ध महिला आपल्या दैनंदिन कामात व्यस्त दिसल्या. काही वृद्ध तांदुळ निवडत होत्या. काही वाचनात मग्न होत्या. तर काही जणी लिहिताना व गप्पा गोष्टीत दंग होत्या. (प्रतिनिधी)
फोटो : हरमल प्राप्ती महिला फेडरेशनच्या शिष्टमंडळाने शिवोली येथील सेंट मेरी होम फॉर एज या महिला वृद्धाश्रमाला भेट दिल्यानंतर त्यांना अन्नपदार्थ वितरीत करताना नारायण रेडकर, सिस्टर आवेलिना, स्नेहा कान्होजी व नमिता ठाकूर. (लक्ष्मण ओटवणेकर) ०५०३-एमएपी-०९