शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

२०३० मध्ये विश्वनाथन होणार देशाचे सरन्यायाधीश! एवढी वर्षे आधीच कसे काय ठरते...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 2:00 PM

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच ज्येष्ठ वकील के. व्ही. विश्वनाथन आणि इतर काहींच्या नावावर तत्कालीन CJI लळीत यांच्या नेतृत्वाखालील सुप्रीम कोर्ट कॉलेजियममध्ये शिक्कामोर्तब होणार होते.

नवी दिल्ली: सीजेआय डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यांच्या कॉलेजियमने केंद्राकडे वरिष्ठ अॅडव्होकेट के. व्ही. विश्वनाथन यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनविण्याची शिफारस केली आहे. याशिवाय आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांना देखील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नेमण्याची शिफारस करण्यात आली आहे. 

मिश्रा हे जे. बी. पारदीवाला यांचे उत्तराधिकारी बनू शकतात, त्यांचा कार्यकाळ ९ महिन्यांचा असणार आहे. मिश्रा यांच्या न्यायमूर्ती बनण्याने छत्तीगढला पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व मिळणार आहे. हे राज्य बनून २३ वर्षे झाली आहेत. 

न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि एम. आर. शहा यांच्या निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयात 2 पदे रिक्त आहेत. याच्या दुसऱ्याच दिवशी कॉलेजियमने न्यायाधीशांसाठी दोन नावांची शिफारस केंद्र सरकारकडे पाठवली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कसे ठरतात...सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश सरन्यायाधीश होऊ शकेल की नाही, हे त्यांच्या शपथेवरच ठरत असते. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे आहे. जेव्हा एखादे CJI निवृत्त होतात तेव्हा त्यावेळेस सर्वात वरिष्ठ असणारे न्यायाधीश CJI होतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या शपथविधीच्या आदेशातही ज्येष्ठतेची काळजी घेतली जाते. जे ज्येष्ठतेमध्ये पहिले आहेत, त्यांना प्रथम शपथ दिली जाते. जे जज एकाच दिवशी शपथ घेतात त्यांच्यातही जो पहिला शपथ घेतो तो सिनिअर असतो. 

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच ज्येष्ठ वकील के. व्ही. विश्वनाथन आणि इतर काहींच्या नावावर तत्कालीन CJI लळीत यांच्या नेतृत्वाखालील सुप्रीम कोर्ट कॉलेजियममध्ये शिक्कामोर्तब होणार होते. मात्र या प्रस्तावावर खुली चर्चा करण्याऐवजी ललित यांनी थेट कॉलेजियम सदस्यांकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतला. आणि त्याला आताचे सीजेआय चंद्रचूड व एस. ए. नजीर यांनी आक्षेप घेतला. यामुळे विश्वनाथन यांच्या नावाची शिफारस करता आली नाही. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय