पणजी : ‘व्हिवा कार्निव्हल, व्हिवा कार्निव्हल’च्या गुजरात राजधानीतील मांडवीचा काठ शनिवारी सायंकाळी गजबजून उठला. ‘खा, प्या, मजा करा’चा संदेश देत कार्निव्हलला सुरुवात झाली. किंग मोमो शालोम सार्दिन यांच्या चित्ररथाने कार्निव्हल चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ झाला. जुन्या सचिवालयासमोर व्यासपीठावर उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, कदंब महामंडळाचे अध्यक्ष कार्लुस आल्मदा, मुख्य सचिव आर.के. श्रीवास्तव उपस्थित होते. दुपारी तीन वाजल्यापासूनच जुन्या सचिवालयाकडे कार्निव्हल पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी होत होती. रायबंदर पाटो रस्त्यावर मिरवणुकीसाठीचे ६५ चित्ररथ रांगेत ठेवले होते. जुने सचिवालय ते कांपाल परेड मैदानापर्यंत चित्ररथ मिरवणूक काढली. (प्रतिनिधी)मौजमजा आणि सेल्फीज्कार्निव्हलसाठी नागरिकांनी चित्ररथांचे, कलाकारांचे फोटो घेतानाच सेल्फी काढण्यावरही भर दिला. युवावर्ग छायाचित्रांच्या दुनियेत हरवून गेला होता. सेल्फी काढण्यासाठी गटागटाने मुले आणि इतर लोक एकत्र येत होते. किंग मोमोच्या चित्ररथानंतर ‘व्हिवा कार्निव्हल’ म्हणून सगळे एकमेकांना शुभेच्छा देत होते.रंगीबेरंगी मुखवटे, टोप्या...काहींसाठी मौजमस्तीचा असलेला कार्निव्हल रंगीत टोप्या आणि मुखवटे विक्रेत्यांना मात्र ‘कमाईचा सण’ ठरला. रंगीबेरंगी आकर्षक मुखवटे, टोप्या आदी साहित्य विक्रीसाठी उपलब्ध होते. लहान मुले, युवावर्ग या टोप्या आणि मुखवट्यांच्या पेहरावात सहभागी होते.
व्हिवा कार्निव्हलला जल्लोषात सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2016 1:20 AM