Vladimir Putin-PM Modi Talk:भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात सोमवारी (28 ऑगस्ट) फोनवर चर्चा झाली. भारतात होणाऱ्या G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये संभाषण झाले. यावेळी ब्रिक्सच्या विस्तारासह विविद करारांच्या महत्त्वावरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी बोलून द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक मुद्द्यांवर प्रगतीचा आढावा घेतल्याचे पीएमओने म्हटले आहे. मोठ्या प्रमाणावर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचा आणि लॉजिस्टिक पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याचा दोन्ही नेत्यांचा मानस आहे. दोन्ही देशांमधील अंतराळ सहकार्य विकसित करण्याबाबतही बोले झाले आहे.
G-20 साठी पुतीन भारतात येणार नाहीतPMO ने माहिती दिली की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी 9-10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या G20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली आहे. पुतिन यांच्या वतीने रशियन फेडरेशनचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव भारतात येतील. रशियाच्या निर्णयाशी सहमती दर्शवत पीएम मोदींनी रशियाच्या पाठिंब्याबद्दल पुतिन यांचे आभार मानले.
ब्रिक्स परिषदेलाही अनुपस्थितीअलीकडेच दक्षिण आफ्रितेक ब्रिक्स परिषत पार पडली. त्यातही रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी भाग घेतला नव्हता. त्यांच्या जागी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव सामील झाले होते. पुतिन यांच्या अनुपस्थितीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.