शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

उत्तराखंडच्या खर्चावर वटहुकूम

By admin | Published: April 02, 2016 2:09 AM

राष्ट्रपती राजवटीखाली असलेल्या उत्तराखंडमधील खर्चाला परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी वटहुकूम जारी केला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी उत्तराखंड विनियोग

नवी दिल्ली : राष्ट्रपती राजवटीखाली असलेल्या उत्तराखंडमधील खर्चाला परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी वटहुकूम जारी केला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी उत्तराखंड विनियोग (लेखानुदान) वटहुकूम २०१६ जारी केला आहे, असे एका सरकारी अधिसूचनेत म्हटले आहे. या वटहुकूमाचा उद्देश २०१६-१७ या वित्त वर्षाच्या एका भागासाठी सेवांकरिता उत्तराखंड राज्याच्या एकत्रित निधीमधून काही रक्कम काढण्याची व्यवस्था करणे हा आहे, असे या अधिसूचनेत म्हटले आहे.‘संसदेचे अधिवेशन सुरू नाही, त्यामुळे हा वटहुकूम जारी करण्यात येत आहे. उत्तराखंड राज्याच्या वित्तीय कामकाजाच्या संचालनासाठी तत्काळ पाऊल उचलण्याच्या उद्देशाने हा वटहुकूम जारी करणे आवश्यक आहे, याबाबत राष्ट्रपतींचेही समाधान झालेले आहे,’ असे या अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.राज्यात चालू वित्त वर्षासाठी काही सेवांवर होणारा खर्च भागविण्याच्या उद्देशाने १३,६४२.४३ कोटी रुपये काढण्याची अनुमती या वटहुकूमाद्वारे देण्यात आली आहे. ं(लोकमत न्यूज नेटवर्क)उत्तराखंडवर केंद्र सरकारने जारी केलेला वटहुकूम घटनाबाह्य आहे. विधानसभेने १८ मार्च रोजीच विनियोग विधेयक पारीत केले होते आणि अध्यक्षांनी घोषणाही केली होती, असे काँग्रेसने म्हटले आहे. एक राज्य विधानसभेने संमत केलेला आणि दुसरा केंद्र सरकारतर्फे वटहुकूम जारी करून आणलेला असे दोन अर्थसंकल्प असू शकतात काय? विधानसभेतील कार्यवाही केंद्र कशी काय बदलू शकतो? ही कृती घटनाबाह्य आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी म्हणाले.