अमरावती: निवडणुकीपूर्वी सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासने देत असतात. पण, एका भाजप नेत्याचे आश्वास चर्चेचा विषय बनला आहे. आंध्र प्रदेशचे भारतीय जनता पक्षाचे (BJP) अध्यक्ष सोमू वीरराजू (Somu Veerraju) यांनी आंध्र प्रदेशात भाजपची सत्ता आल्यास अवघ्या 50 रुपयांमध्ये दारू दिली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
'राज्यात दर्जेदार कंपनीच्या दारू नाहीत'एकीकडे बिहारमध्ये भाजप-राजदचे युतीचे सरकार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दारु बंदीची घोषणा केली आहे. त्यांचा हा निर्णय चर्चेत आहे, पण दुसरीकडे भाजप नेत्याच्या विधानामुळे पक्ष अडचणीत येऊ शकतो. सध्या दर्जेदार दारुच्या बाटलीची किंमत 180-200(180ml) रुपयांपेक्षा जास्त आहे. मंगळवारी विजयवाडा येथे पक्षाच्या जाहीर सभेला संबोधित करताना, वीरराजू यांनी निकृष्ट दर्जाची दारू चढ्या किमतीत विकल्याबद्दल राज्य सरकारवर टीका केली. राज्यात सर्वच बनावट ब्रँड्स चढ्या किमतीत विकले जातात, तर लोकप्रिय आणि लोकप्रिय ब्रँड्स उपलब्ध नसल्याचा आरोप त्यांनी केला.
'1 कोटी दारु पिणाऱ्यांनी आम्हाला मत द्यावे'ते पुढे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक व्यक्ती दारुवर महिन्याला 12 हजार रुपये खर्च करत आहे. राज्यात एक कोटी लोक दारुचे सेवन करतात. या एक कोटी लोकांनी 2024 च्या निवडणुकीत भाजपला मतदान करावे. आमची सत्ता आल्यास दर्जेदा रदारू 75 रुपये प्रति बाटली दराने देऊ. जर राज्याचा महसूल वाढला, तर ही किंमत 50 रुपये प्रति बाटली करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
'सत्ताधारी नेत्यांचे दारुचे कारखाने'
वीरराजू पुढे म्हणाले, राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे दारुचे कारखाने आहेत. ते सरकारला स्वस्तात दारू पुरवतात. भाजपची सत्ता आल्यास राज्यातील जनतेला मोफत शिक्षण आणि मोफत आरोग्य योजना देण्याचे आश्वासनही सोमू वीरराजू यांनी दिले. राज्यात दर्जेदार शिक्षण आणि दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचे आश्वासन देत शेतीला पर्यायही आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.