'हाताशिवाय दुसरं बटण दाबल्यास करंट बसेल', काँग्रेस नेत्याची मतदारांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 05:09 PM2019-04-17T17:09:30+5:302019-04-17T17:10:29+5:30

काँग्रेसचे लोकसभा उमेदवार बिरेश ठाकूर यांना मतदान करण्याचे आवाहन कवासी लखमा यांनी कनकेर मतदारसंघातील मतदारांना केलं होतं.

Voters will suffer electric shock if they vote for non-Congress candidate: Chhattisgarh minister | 'हाताशिवाय दुसरं बटण दाबल्यास करंट बसेल', काँग्रेस नेत्याची मतदारांना धमकी

'हाताशिवाय दुसरं बटण दाबल्यास करंट बसेल', काँग्रेस नेत्याची मतदारांना धमकी

Next

रायपूर - निवडणूक आयोगाकडून कवासी लक्ष्मा यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. मतदारांना धमकी देऊन भीती घातल्याबद्दल लखमा यांना आयोगाने नोटीस बजावली. कवासी लखमा हे छत्तीसगड सरकारमध्ये मंत्री आहेत. लखमा यांनी मतदारांना भीती घालताना, जर काँग्रेसशिवाय इतर कोणतेही बटन दाबले, तर तुम्हाला इलेक्ट्रीक शॉक बसेल, असे म्हटले होते. त्यामुळे काँग्रेस उमेदवारालाच मतदान करा, असे आवाहन लखमा यांनी केले आहे.

काँग्रेसचे लोकसभा उमेदवार बिरेश ठाकूर यांना मतदान करण्याचे आवाहन कवासी लखमा यांनी कनकेर मतदारसंघातील मतदारांना केलं होतं. बिरेश ठाकूर यांचे बटण पहिल्या क्रमांकाचे आहे. त्यामुळे पहिल्याच क्रमांकाचे बटण दाबा, जर दुसऱ्या क्रमांकाचे बटण दाबले तर तुम्हाला इलेक्ट्रीक करंट बसेल, अशी भीती लखमा यांनी मतदारांमध्ये घातली होती. केवता येथील एका सभेला संबोधित करताना लखमा यांनी उपस्थित जनसमुदायाला काँग्रेसलाच मतदान करण्याचे आवाहन केले. मात्र, दुसरे बटण दाबल्यास करंट बसेल, असेही सांगितले होते. 

निवडणूक आयोगाने लखमा यांना नोटीस बजावली असून याप्रकरणी 3 दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. तेथील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विक्रम उसेंडी यांनी लखमा यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला असून मंत्रीमहोदयांकडून मतदारांची दिशाभूल करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. लखमा यांच्याकडून आदर्श आचारसंहितेचाही भंग झाल्याचे उसेंडी यांनी म्हटले होते. दरम्यान, 18 एप्रिल रोजी कनकेर मतदारसंघात मतदान होत आहे. 
 

Web Title: Voters will suffer electric shock if they vote for non-Congress candidate: Chhattisgarh minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.