शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

विधानसभेसाठी मतदान : यूपीत आज पहिला टप्पा

By admin | Published: February 11, 2017 1:13 AM

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शनिवारी होत आहे. १५ जिल्ह्यातील ७३ मतदारसंघात विविध राजकीय पक्षांची प्रतिष्ठा आज पणाला लागणार आहे

लखनौ : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शनिवारी होत आहे. १५ जिल्ह्यातील ७३ मतदारसंघात विविध राजकीय पक्षांची प्रतिष्ठा आज पणाला लागणार आहे. राज्यात ११ फेब्रुवारी ते ८ मार्च या काळात सात टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, मतदानाच्या पार्श्वभूमीवर सहा हजार निमलष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळपास तीन वर्षांच्या कार्यकाळाची ही परीक्षा समजली जात आहे. पश्चिमांचलच्या मुस्लिमबहुल भागात मतदान होत आहे. यात प्रामुख्याने शामली, मुजफ्फरनगर, बागपत, मेरठ, गाजियाबाद, गौतमबुद्धनगर, हापुड, बुलंदशहर, अलीगढ, मथुरा, हाथरस, आग्रा, फिरोजाबाद, एटा आणि कासगंज जिल्ह्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील या मतदानात १ कोटी १७ लाख महिलांसह एकूण २ कोटी ६० लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ८३९ उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला होणार असून मतदानासाठी २६,८२३ केंद्र असणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानात जे प्रमुख उमेदवार आहेत त्यात नोएडामधून केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांचे चिरंजीव पंकज सिंह, भाजपचे संसद सदस्य हुकुम सिंह यांची मुलगी मृगांका कैराना मतदारसंघातून तर, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीकांत शर्मा आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते प्रदीप माथुर हे मथुरा येथून निवडणूक लढवित आहेत. भाजपचे वादग्रस्त आमदार संगीत सोम आणि सुरेश राणा अनुक्रमे सरधना आणि थाना भवन येथून नशिब आजमावत आहेत. बागपत हा राष्ट्रीय लोक दलाचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत बाजपेयी मेरठमधून, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे जावई राहुल सिंह हे सपाच्या तिकीटावर सिंकंदराबादहून निवडणूक लढत आहेत. राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांचे नातू संदीप सिंह हे अतरौली येथून निवडणूक लढत आहेत. ज्या भागांत २०१३ मध्ये दंगल झाली होती, त्या मुजफ्फरनगर आणि शामली जिल्ह्यांतही मतदान होत आहे. तेथील अनेक मतदारसंघ संवेदनशील ठरवण्यात आले असून, तिथे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.