गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. जवळपास निम्मा गुजरात आज मतदानाचा हक्क बजावणार आहे. दक्षिण गुजरातमधील १९ जिल्हे व कच्छ-सौराष्ट्रमधील ८९ विधानसभा जागांसाठी मतदान होणार असून ७८८ उमेदवार रिंगणात आहेत. गुजरातमधील निवडणूक एकतर्फी होईल असे अंदाज असताना सकाळी सुस्त मतदानाला सुरुवात झाल्याने वेगवेगळ्या शंका घेण्यात येत होत्या. परंतू, ११ वाजेपर्यंत अचानक मतदानाचा वेग वाढल्याने पक्षांमध्ये धाकधुक वाढली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत मतदारांना आवाहन केलं आहे. गुजरात निवडणुकीचा आज पहिला टप्पा आहे. आज मतदान करणार्या सर्वांना, विशेषत: प्रथमच मतदान करणाऱ्या लोकांनी विक्रमी संख्येने मतदान करावे, असे मी आवाहन करतो, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, २०१७ मध्ये गुजरातमध्ये ६९ टक्के मतदान झाले होते. यापैकी भाजपाला ४९ टक्के मते मिळाली होती. तर काँग्रेसला ४१ टक्के मते मिळाली होती. यंदा आप रणांगणात उतरल्याने दोन्ही पक्षांची काही लाख मते ही आपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. यामुळे देखील निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी आपला २४ हजार मते मिळाली होती. परंतू यावेळी आप पूर्ण ताकदीनिशी उतरली आहे. दुसरा टप्पा ५ डिसेंबरला पार पडणार असून निकाल ८ डिसेंबरला लागेल.
पहिला टप्प्यातील उमेदवार-
८९- भाजप
८९- काँग्रेस
८८- आप
५७- बसप
१२- सपा
एकूण मतदार- २,३९,७६,६७०
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"