शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

२३ ग्रामपंचायतींसाठी १७ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया सुरु : २१ रोजी निकाल

By admin | Published: March 15, 2016 12:35 AM

जळगाव : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगाव जिल्‘ातील २३ ग्रामपंचायतींसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होणार असून अंतिम निकाल २१ रोजी प्रसिद्ध होणार आहे.

जळगाव : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगाव जिल्‘ातील २३ ग्रामपंचायतींसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होणार असून अंतिम निकाल २१ रोजी प्रसिद्ध होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे साहाय्यक आयुक्त के.सूर्यकृष्णमूर्ती यांनी मे ते ऑगस्ट २०१६ या कालावधित मुदत संपणार्‍या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांच्या पोटवणुक घेण्याबाबत निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार शुक्रवार १८ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
२९ मार्च ते २ एप्रिल दरम्यान सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत नामनिर्देशनपत्रे सादर करण्यात येणार आहे. ४ एप्रिल रोजी आलेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे.
बुधवार ६ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेण्यात येणार आहे. याच दिवशी दुपारी तीन वाजेनंतर निवडणूक चिन्ह वाटप तसेच उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
रविवार १७ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत २३ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील त्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. गुरुवार २१ रोजी ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक
यावल तालुका : मालोद, परसाडे बुद्रुक. रावेर तालुका : जिन्सी, कुसुंबे बुद्रुक, कुसुंबे खुर्द, लोहारे, मोहमांडली, निमड्या, पाडळे बुद्रुक, पाल, सहस्त्रलिंग, पिंप्री, मंगरुळ-जुनोने. चोपडा तालुका : उमर्टी, सत्रासेन, मोरचिडा, कर्जाणे, कृष्णापूर, वैजापूर, मेलाणे, देव्हारी, बोरअजंती, मोहरद या २३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे.