ज्या खासदाराने मिमिक्री केली, त्यांनाच जगदीप धनखड यांनी जेवणाचे आमंत्रण दिले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 08:11 PM2024-01-04T20:11:50+5:302024-01-04T20:12:19+5:30

जगदीप धनखड यांनी TMC खासदार कल्याण बॅनर्जी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि कुटुंबासमवेत जेवणाचे आमंत्रणही दिले.

VP Jagdeep Dhankhar Wishes TMC MP Kalyan Banerjee on His Birthday | ज्या खासदाराने मिमिक्री केली, त्यांनाच जगदीप धनखड यांनी जेवणाचे आमंत्रण दिले...

ज्या खासदाराने मिमिक्री केली, त्यांनाच जगदीप धनखड यांनी जेवणाचे आमंत्रण दिले...

Jagdeep Dhankhar-Kalyan Banerjee : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचे मिमिक्री प्रकरण चांगलेच गाजले होते. आता धनखड यांनी मोठं मन दाखवत मिमिक्री करणाऱ्या तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि कुटुंबासमवेत जेवणाचे आमंत्रणही दिले. 

टीएमसी खासदारांनी X वर धनखड यांचे आभार मानले. ते म्हणाले की, 'माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल माननीय उपराष्ट्रपतींचे आभार मानतो. त्यांनी मला आणि माझ्या पत्नीला दिल्लीतील निवासस्थानी जेवणाचे आमंत्रण दिले आहे. तसेच, वैयक्तिकरित्या टेलिफोनवर बोलून माझ्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद दिल्याने मी भारावून गेलो आहे,' असे कल्याण बॅनर्जी म्हणाले. 

नेमकं काय प्रकरण आहे?
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तृणमूल खासदारांनी संसद संकुलाक जगदीप धनखड यांची नक्कल केली होती. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या फोनवर हा सगळा प्रकार रेकॉर्ड केला. यानंतर, धनखड यांनी या प्रकरावर तीव्र नाराजी व्यक्त केली. विरोधकांनी सभापतीच्या खुर्चीचा आणि माझ्या समाजाचा अपमान केला, असा आरोप धनखड यांनी केला. या घटनेचे पडसाद संपूर्ण अधिवेशनात उमटले.

Web Title: VP Jagdeep Dhankhar Wishes TMC MP Kalyan Banerjee on His Birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.