रानी (आसाम): विलुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या गिधाडांना नवसंजीवनी देण्यासाठी मुंबईच्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) येथील केंद्रात बंदिस्त पिंजºयात गिधाडांचे प्रजनन केले. आता त्यापैकी बरीच गिधाडे नैसर्गिक आयुष्य जगण्यास जंगलीत सोडण्याएवढी मोठी झाली आहेत. परंतु ही गिधाडे पुन्हा ‘विषारी अन्न’ खाऊन दगावण्याचा धोका कायम असल्याने त्यांचे जंगलात सोडणे लांबणीवर पडले आहे.देशातील ९९ टक्के गिधाडे नष्ट झाल्याने निसर्गातील सर्वात कार्यक्षम ‘सफाई कामगार’ म्हणून ओळखल्या जाणाºया या पक्ष्यांची प्रजाती टिकून राहावी यासाठी ‘बीएनएचएस’ने देशभरात चार ठिकाणी राज्यांच्या वन विभागांच्या मदतीने गिधाड जतन व प्रजनन केंद्रे सुरु केली. गुवाहाटी शहराच्या पश्चिमेस ३० किमी अंतरावरील या गावातील केंद्र हे त्यापैकीच एक.राणी केंद्राचे व्यवस्थापक सचिन रानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या केंद्रात १०४ गिधाडे आहेत. जंगलातून अगदी लहान पिल्ले असताना आणून सर्वांना वाढविले गेले. आसाममध्ये आढळणाºया सहापैकी दोन प्रजातींची ही गिधाडे पांढºया पाठीची व लहान चोचीची आहेत. यापैकी ३० पक्षी आता जंगलात सोडले तरी स्वतंत्रपणे जगू शकतील एवढे मोठे झाले आहेत.रानडे म्हणाले की, गुरांना वेदनाशामक म्हणून दिल्या जाणाºया ‘डेक्लोफेनॅक’ या इंजेक्शनच्या मोठ्या कुप्यांच्या उत्पादनाला बंदी घातली असली तरी डिसेंबर २०१५ पूर्वी उत्पादित केलेला माल विकण्यास परवानगी दिली गेली आहे. तो माल अजून संपलेला नसल्याने मेलेल्या जनावरांमधून गिधाडांना विषबाधा होण्याचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. शिवाय या परिसरातील ७० हजार चहामळयांमध्ये व अन्य शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणावर केला जाणारा कीटकनाशकांचा वापरही गिधाडांसाठी संभाव्य धोका आहे.माणसांना ‘डेक्लोफेनॅक’ इंजेक्शन देताना ३ ते ५ मिली औषध वापरले जाते. परंतु गुरांना ३० मिलीचे इंजेक्शन दिले जाते. या ‘डेक्लोफेनॅक’ इंजेक्शनचा अंश ती मरेपर्यंत त्यांच्या शरिरात कायम राहतो.मेलेल्या जनावरांचेसडलेले मांसही पचविणाºया गिधाडांना ‘डेक्लोपेनॅक’सारखी रसायने मात्र मारक ठरतात. देशातील गिधाडे या ‘डेक्लोफेनॅक’मुळेच विलुप्ततेच्या धोक्यापर्यंतपोहोचली आहेत.राणी प्रजनन केंद्रातील गिधाडे सुरक्षित राहावीत, यासाठी कसोशीने काळजी घेतली जाते. येथे गिधाडांना फक्त मांसच खायला दिले जाते. त्यासाठी आणलेले बोकड, त्यांच्या शरीरात ‘डेक्लोफेनॅक’ किंवा अन्य विषारी रसायनांचा लवलेशही राहू नये, यासाठी १०-१२ दिवस बांधून ठेवले जातात. त्यांना केंद्रात खायला दिले जाते व नंतर मारून ते गिधाडांना दिले जातात.भटके कुत्रे, लांडगे व बिबट्यांचा त्रास कमी व्हावा, यासाठी शेतकरी जनावरांच्या मृत शरीरांमध्ये कीटकनाशके भरून ठेवतात. मात्र, गिधाडे निष्कारण बळी पडतात. १८ मार्च रोजी मेलेल्या बोकडाच्या शरीरात भरलेल्या कीटकनाशकांनी ‘हिमालयन गिफ्फॉन’ जातीच्या ३२ गिधाडांचे प्राण घेतले होते.
मुंबईमध्ये पिंजऱ्यात वाढविलेल्या गिधाडांचाही जीव धोक्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 3:19 AM