नवी दिल्ली - उद्योजक हर्ष गोएंका यांनी देशात सीएए आणि एनआरसीवरुन सुरू असलेल्या आंदोलनाला अनुसरून एक ट्विट केल आहे. या ट्विटमधून त्यांनी भारतीय नागरिकांच्या जाणीवेबद्दल भाष्य केलंय. केंद्र सरकारने देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू केला आहे. मात्र, काँग्रेससह विरोधी पक्षांनी या कायद्याला आपला विरोध दर्शवला. त्यानंतर, विद्यार्थी संघटनांनीही हा कायदा संविधानविरोधी असल्याचे सांगत कायद्याविरुद्ध आंदोलन सुरू केले आहे.
अलिगढमधील जामिया-मालिया विद्यापीठात सीएए कायद्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी आंदोलन उभारले होते. या आंदोलनावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि मारहाण केली. त्यानंतर देशभर या घटनेचे पडसाद उमटले. देशभरातून सीएए कायद्याला विरोध होऊ लागला. अनेक ठिकाणी हिंसक वळणही लागले. अनेकांमध्ये संभ्रमही निर्माण झाला. मुस्लीम समाजाच्याविरोधी हा कायदा असल्याच्या अफवाही पसरविण्यात आल्या. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेकांनी पुढे येऊन सीएए आणि एनआरसीबद्दल सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
आरपीजी ग्रुपचे मालक आणि देशातील नामांकित उद्योजक हर्ष गोएंका यांनी सीएए आणि एनआरसीबद्दल एक ट्वि केलंय. नक्कीच, भारतीय नागरिकांना गोएंका यांचे ट्विट विचार करायला भाग पाडणारे आहे. मात्र, गोएंका यांच्या ट्विटनंतर नेटीझन्सने त्यांना ट्रोल केलं आहे. विशेष म्हणजे त्यानंतर, एका RJ चं ट्विट रिट्विट करत हर्ष गोएंका यांनी गाण्यातून ट्रोलर्संना सुनावले. भारतीय लोक साधे नियम पाळत नाहीत, जसं कीसिग्नल, लाल दिवा पाहिल्यानंतर जागेवर थांबणेरोडवर न थुंकणेगाडी चालवताना मोबाईलवर न बोलणेगाडी चालवताना सीटबेल्ट लावणे.
मात्र, भारतीय नागरिकांना अतिशय गुंतागुंतीचं असलेल्या सीएए, सीएबी आणि एनआरसीबद्दल संपूर्ण ज्ञान आहे, असे ट्विट हर्ष गोएंका यांनी केलं आहे.