वाघूरने केली सत्तरी पार... मेहरूण तलाव ओव्हर फ्लोच्या मार्गावर : जळगावकरांसाठी भक्कम पाणी साठा, शेतीलाही पाणीच पाणी
By admin | Published: September 26, 2016 12:35 AM
जळगाव : परतीचा पाऊस जळगावकरांसाठी सुखद ठरत असून शहरास पाणी पुरवठा होत असलेल्या वाघूर धरणात पाणी साठा गेल्या दोन दिवसांपासून सातत्त्याने वाढतो आहे. या धरणाने आता सत्तरी पार केल्याने जवळपास तीन वर्षांचा पाणी साठा आता उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. धरणात आता जवळपास ७२ टक्के पाणी साठा झाला आहे.
जळगाव : परतीचा पाऊस जळगावकरांसाठी सुखद ठरत असून शहरास पाणी पुरवठा होत असलेल्या वाघूर धरणात पाणी साठा गेल्या दोन दिवसांपासून सातत्त्याने वाढतो आहे. या धरणाने आता सत्तरी पार केल्याने जवळपास तीन वर्षांचा पाणी साठा आता उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. धरणात आता जवळपास ७२ टक्के पाणी साठा झाला आहे. जिल्ात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस आहे. अपवाद होता तो जामनेर तालुक्याचा या तालुक्यात तसेच वाघूर नदीच्या उगमस्थळी समाधानकारक पाऊस नसल्याने वाघूरच्या मागील वर्षीच्या पाणी साठ्यात फारशी वाढ अशी नव्हतीच. गेल्या आठवड्यात या धरणाच्या उपयुक्त पाणी साठ्याची टक्केवारी ६१ टक्के होती. ६१ ठक्के साठा म्हणजे शहराच्या पाणी पुरवठ्याची दोन वर्षांची चिंता मिटली अशी परिस्थिती होती. परतीच्या पावसाची कृपाजळगाव शहर व तालुक्यात समाधानकारक पाऊस आहे. वाघूर प्रकल्प क्षेत्र तसेच जामनेर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत ६० ते ६५ टक्के पाऊस झाला होता. एकीकडे जिल्ातील बहुतांश तालुक्यात सरासरी पाऊस पडत असताना जामनेर तालुक्यात असे चित्र होते. परतीच्या पावसाने मात्र वाघूरच्या पाणलोट क्षेत्रावर कृपा केल्याचीच परस्थिती आहे. पाणी साठ्यात झपाट्याने वाढजुलै महिन्यात वाघूर प्रकल्पात ५० टक्के पाणी साठा होता. तोनंतर हळू हळू वाढत जाऊन गेल्या आठवड्यात ६१ टक्क्यांवर आला. जामनेर तालुका तसेच वाघूर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जवळपास संपूर्ण पावसाळ्यात फारसा पाऊस नसल्याने ६१ च्या जवळपासच साठा थांबेल असे चित्र असताना दोन दिवसातील परतीच्या पावसाने वाघूर व उपनद्यांना पुर आला असून त्याचे परिणाम वाघूर धरणाच्या पाणी साठ्यावर होत असल्याचे लक्षात येत आहे. -----अशी होती तीन वर्षातील स्थितीगेल्या वर्षी धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस नव्हता. २०१३, २०१४ मध्ये धरणाच्या लाभ क्षेत्रात अतिशय चांगला पाऊस झाल्याने वाघूर धरण १०० टक्के भरले होते. परिणामी परिसरातील पिण्याच्या व शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले होते. जिल्हयातील अतिशय महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये मोडणार्या या प्रकल्पावरून जळगाव, जामनेर व भुसावळ तालुक्यातील काही गावांना सिंचनासाठी वाघूरच्या पाण्याचा उपयोग होत असतो. २०१५ मध्ये पावसाचे प्रमाण अतिशय नगण्य होते मात्र शिल्लक साठ्यामुळे पाण्याची अडचणी निर्माण होऊ शकली नाही. २०१२ मध्ये कमी पावसामुळे धरणात शुन्य टक्के साठा झाला होता. -----साठा पोहोचला ७२ टक्क्यांवरअजिंठ्या नजीक लेण्यांच्या परिसरातील पर्वत रांगांमधून वाघूर नदीचे उगमस्थान आहे. या परिसरात चांगला पाऊस सुरू असून पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणात रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ७२ टक्के पाणी साठा झाला आहे. या साठ्यामुळे जळगाव शहरास तीन वर्षे पुरेल एवढा पाणी साठा धरणात उपलब्ध असून जवळपास २५ हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. याचा फायदा रब्बीचे क्षेत्रही यंदा वाढणार असल्याचे चित्र वाघूरच्या पाणी साठ्यामुळे निर्माण झाले आहे