१६ ग्रामपंचायतींचे मागितले फेरठराव १६३ कोटींची वाघूर सिंचन योजना : बंद पाईपांव्दारे पाणी पुरवठा
By admin | Published: August 01, 2016 11:57 PM
जळगाव : वाघूर धरणावरून सिंचनासाठी पाईप लाईनने पाणी देण्याच्या योजनेचा केंद्र शासनाच्या पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश झाला मात्र १६३ कोटींच्या या योजनेस विरोध दर्शविणारे ग्रामपंचायतींचे ठराव अथडथळा ठरत असून त्यापासून ग्रामस्थांचे मन वळविण्यासाठी १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत या गावांचे फेरठराव मिळावेत यासाठी तापी पाटबंधारे महामंडळाचे प्रयत्न सुरू असून त्यासंदर्भातील भेटी गाठींनाही आता वेग आला आहे.
जळगाव : वाघूर धरणावरून सिंचनासाठी पाईप लाईनने पाणी देण्याच्या योजनेचा केंद्र शासनाच्या पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश झाला मात्र १६३ कोटींच्या या योजनेस विरोध दर्शविणारे ग्रामपंचायतींचे ठराव अथडथळा ठरत असून त्यापासून ग्रामस्थांचे मन वळविण्यासाठी १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत या गावांचे फेरठराव मिळावेत यासाठी तापी पाटबंधारे महामंडळाचे प्रयत्न सुरू असून त्यासंदर्भातील भेटी गाठींनाही आता वेग आला आहे. वाघूर नदीच्या उपखोर्यातील वाघूर हा प्रकल्प वाघूर नदीवरच बांधण्यात आला आहे. या प्रकल्पात एकूण ३२५ दलघमी पाणी साठा होऊ शकतो. या प्रकल्पातून सिंचनाचे नियोजनही करण्यात आले आहे. यासाठी डावा कालवा व उजवा कालवा प्रस्तावित आहे. डाव्या कालव्याची लांबी १६.८५ किलो मीटरपर्यंत असून उजव्या कालव्याची लांबी २४ किलो मीटरपर्यंत आहे. यासाठी खरीप हंगाम, रब्बी हंगाम, उन्हाळी पिके यासाठी २३६.०७ दलघमी पाणी देणे प्रस्तावित आहे. जळगाव तालुक्यातील ५१ गावांमधील १४ हजार ९६० हेक्टरात या माध्यमातून पाणी मिळू शकते. उजव्या कालव्यावर काही भागात कालव्यांची कामेही झाली आहे. १६ गावांचा विरोधडाव्या कालव्यावरील जळगाव तालुक्यातील १६ गावांचा कालव्याने पाणी देण्यास व जमिनी देण्यास गेल्या पाच ते सहा वर्षापासून विरोध होत आहे. १६ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत ठराव करून या योजनेस विरोध दर्शविण्यात आल्याने तापी पाटबंधारे महामंडळ हतबल झाल्यागत परिस्थिती होती. उच्च न्यालयापर्यंत याप्रश्नी ग्रामस्थांनी याचिका दाखल केल्या त्यामुळे या गावांच्या परिसरात बंदिस्त पाईप लाईनने पाणी देणे प्रस्तावित आहे. विशेष म्हणजे या योजनेचा केंद्र शासनाच्या कृषी सिंचन योजनेत समावेश झाल्याने निधीची उपलब्धताही आहे. ---या गावांचा होता विरोधजळगाव तालुक्यातील नशिराबाद, कडगाव, भादली, जळगाव खुर्द, कानसवाडे, भोलाणे, सुजदे, नांद्रे, खापरखेडे, धामणगाव, तुरखेडे, विदगाव, आवार, विदगाव, डिकसाई, शेळगाव आदी गावांमधील ग्रामस्थांनी ग्रामसभांमध्ये कालव्यांच्या कामांना विरोध दर्शवत आम्हाला कालव्यांची गरज नसल्याबाबत ठराव करून तापी पाटबंधारे महामंडळास पाठविले होते.