शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

मुकाबल्याची वाट बघा - नरेंद्र मोदी

By admin | Published: July 18, 2015 3:31 AM

विरोधकांनी केलेल्या एकजुटीमुळे वादळी ठरणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘मुकाबल्याची वाट बघा’असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचा आखाडा होण्याचे संकेत दिले.

जम्मू : विरोधकांनी केलेल्या एकजुटीमुळे वादळी ठरणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘मुकाबल्याची वाट बघा’असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचा आखाडा होण्याचे संकेत दिले.शुक्रवारी येथे जम्मू-काश्मीरमधील एकेकाळचे ज्येष्ठ नेते गिरधारीलाल डोगरा यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात त्यांच्या सोबत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करणसिंग हेही एकाच व्यासपीठावर होते. संसदेत विशेषत: राज्यसभेत विरोधकांनी चालविलेली कोंडी पाहता मोदींच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.विसंगतीतच लोकशाहीची सुंदरता आहे, असे सांगत त्यांनी राजकारणातील तात्त्विक अस्पृश्यतेवर प्रहार केला. व्यासपीठावर बसलेल्या काँग्रेस नेत्यांकडे (आझाद) अंगुलीनिर्देश करताना ते म्हणाले की, आम्ही सर्वजण येथे बसलो आहोत; मात्र काही दिवसच प्रतीक्षा करा, तुम्हाला मुकाबला बघायला मिळेल. संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होत असून विरोधकांनी व्यापमं घोटाळा, ललितगेट ते जनगणनेच्या मुद्यावर एकजूट केल्याने गुरुवारी रालोआ मंत्र्यांनी व्यूहरचनेवर चर्चा केली. - मोदींनी घराणेशाहीच्या राजकारणावर खोचक बोलताना अप्रत्यक्षरीत्या काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्या जमीन सौद्यासंबंधी वादाचा उल्लेख केला. डोग्रा यांनी जम्मू-काश्मीरचे अर्थमंत्री असताना २६ अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता; मात्र त्यांनी आपल्या कुटुंबियांसाठी जावई तथा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासाठी काहीही केले नाही. डोग्रा आणि जेटली यांनी आपापला सार्वजनिक जीवनाचा मार्ग अवलंबला. सध्या जावयांबद्दल कोणत्या प्रकारच्या चर्चा सुरू आहेत हे आपल्याला माहीतच आहेत, असा टोलाही त्यांनी हाणला.

(वृत्तसंस्था)