शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
3
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
5
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
6
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
7
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
8
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
9
'उद्धव ठाकरेंना बाहेर काढायचा प्रयत्न काँग्रेस करतंय'; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा
10
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
11
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
12
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
13
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
14
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
15
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
16
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
17
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
18
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
19
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
20
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल

इसिसच्या वाटेवरील वाजीद कर्नाटकातून ताब्यात

By admin | Published: December 23, 2015 2:38 AM

इसिस या दहशतवादी संघटनेत सहभागी व्हायला गेला की काय अशी शंका असलेला मुंबईच्या मालवणी परिसरातील वाजीद शेखला एटीएसने कर्नाटकमधून ताब्यात घेतले

डिप्पी वांकाणी, मुंबईइस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरियामध्ये (इसिस) सहभागी व्हायला गेला की काय अशी शंका असलेला मुंबईच्या मालवणी परिसरातील वाजीद शेख (२५) हा दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) कर्नाटकात आढळला. पण याच भागातून दीड महिन्यापासून बेपत्ता असलेला अयाज सुलतान (२३) हा काबूलला गेल्याची माहिती एटीएसच्या हाती आली आहे. हे दोघे आणखी एकासह इसिसमध्ये दाखल होण्यासाठी गेल्याचा संशय होता. वाजीद हा लिंबू विक्रेता असून, तो १५ डिसेंबरपासून बेपत्ता होता. तर अयाज मालवणीतीलच कॉल सेंटरमध्ये कामाला आहे. वाजीद शेखला मुंबईत आणले गेल्यावर आम्ही त्याच्या हालचालींची तपासणी करून त्याला अटक करायची की नाही याचा निर्णय घेऊ, असे एटीएसमधील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. वाजीद शेखच नव्हे, तर मोहसीन सय्यददेखील १५ डिसेंबरपासूनच बेपत्ता आहे. या दोघांसोबत साधारण विशीतील व त्याच भागातील आणखी एक जण आहे. परंतु तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झालेली नाही. तो प्रवास करीत असताना मध्येच पकडले असून त्याला मुंबईला आणण्यात येत आहे. त्याला दक्षिण भारतात अडविण्यात आले होते. त्याला अटक करावी की करू नये याचा निर्णय अद्याप झालेला नाही,’’ असे एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हा अधिकारी म्हणाला की, ‘‘वाजीदने त्याचा मोबाईल फोन घरीच ठेवला होता व त्याने दुसऱ्या मोबाईलवरून मुंबईबाहेर राहणाऱ्या त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला होता.’’ मोहसीनने प्रवासासाठी ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूडॉटआरईडीबीयुएसडॉटईन’वरून तिकीट बुक केले होते. इतर दोघे चकवा देऊ शकले असले तरी आम्ही त्यांच्या मागावर आहोत, असे हा अधिकारी म्हणाला.वाजीदची पत्नी फातिमाने तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे देताना वाजीदमध्ये खूपच बदल झाल्याचे व जिहादसाठी त्याने सहभागी झालेच पाहिजे, असे मला सांगितले होते, असे म्हटले. त्यांनी घर सोडायच्या आदल्या दिवशी वाजीदला मोहसीनने १४-१५ वेळा फोन केला होता. अशाच एका फोनला फातिमाने उत्तर दिले होते. फोनवर आपल्याशी कोण बोलत आहे हे लक्षात न घेता मोहसीनने आपल्याला १५ डिसेंबर रोजी शहर सोडावे लागेल असे म्हणाला होता, असे फातिमाच्या भावाने सांगितले.मोहसीन व वाजीद यांचे विचार आॅनलाईनवर संपूर्णपणे बदलून टाकण्यात आले आणि या दोघांनी आयसिसशी संबंधित अनेक प्रकारचे साहित्य डाऊनलोड करून घेतले होते, असे एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तो म्हणाला की मालवणी भागातच राहात असलेला व वेगवेगळी कामे करणारा वयाच्या विशीतील तरूण वाजीद व मोहसीनसोबत आहे. आम्ही त्याच्या पालकांकडे त्यांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार का नोंदविली नाही अशी विचारणा करू.दरम्यान, अयाज काबूलला गेला, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. ‘‘अयाजने दिल्लीहून थेट काबुलला जाणारे विमान पकडले. त्याच्यासोबत त्याचा स्वत:ता पासपोर्ट होता. आता आम्ही तो तेथून कुठे गेला का याची माहिती घेत आहोत व तो या तिघांच्या संपर्कातही आहे का हे शोधत आहोत, असे त्याने सांगितले.