नवी दिल्ली - अतिजलद कॉरिडॉरवरील रेल्वेमार्गांच्या दोन्ही बाजूंनी भिंती बांधण्याच्या प्रस्तावावर रेल्वे प्रशासन विचार करीत आहे. या भिंतींमुळे रेल्वे गाड्यांना सुरक्षा मिळेल, तसेच त्या भिंतीवरील जाहिरातींच्या माध्यमातून महसूल मिळेल. भाड्यात वाढ न करता, महसूल वाढविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून याकडे पाहिले जात आहे.भाड्याव्यतिरिक्त अन्य मार्गांनी महसूल वाढविण्यासाठी रेल्वे अनेक पर्यायांवर सध्या विचार करीत आहे. राइट आॅफ वे चार्जेस, जाहिराती, जमिनींचा व्यापारी वापर, भोजन व पार्किंग यांचा त्यात समावेश आहे. प्रवासी व मालाच्या वाहतुकीत रेल्वेला विमान कंपन्या आणि रस्ते वाहतूकदारांकडून स्पर्धेला सामोरे जावे लागते. ही स्पर्धा तीव्र होत आहे. त्यामुळे महसूल वाढविण्याच्या नव्या पर्यायावर रेल्वे गांभीर्यानेविचार करीत आहे.शहरी भागांमध्ये सुरुवातदिल्ली-मुुंबई अतिजलद कॉरिडॉरवर सध्या काम सुरू आहे. या मार्गावरील रेल्वे प्रचंड वेगाने धावणार असल्यामुळे सुरक्षेसाठी अशा भिंतींची गरज आहे. अधिक लोकसंख्या असलेल्या भागातून ती जातो. या संबंधीच्या प्रकल्पावर काम केले जात आहे. प्रारंभी शहरी भागातून जाणाऱ्या रेल्वेमार्गाच्या बाजूने भिंती बांधण्यात येतील. तेथील अनुभव लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.
रेल्वेच्या हाय-स्पीड मार्गांलगत बांधणार भिंती, भाडेवाढ टाळणार, भिंतीवरील जाहिरातींतून मिळविणार महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 1:42 AM