शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
4
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
6
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
7
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
8
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
9
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
10
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
11
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
12
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
13
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
14
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
15
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
16
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
17
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
18
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
19
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा

‘वणियार’ म्हणतील ती पूर्व; 30 मतदारसंघांत प्रभाव! आरक्षणामुळे अण्णा द्रमुककडे कल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 4:13 AM

अण्णा द्रमुकशी आघाडी केलेला एस. रामदास यांचा पीएमके या समुदायाचे नेतृत्व करीत आला आहे. पीएमके २३ जागा लढवीत असून, त्यातील बहुतांश जागा उत्तर तामिळनाडूतील आहेत. तिथे विरोधी पक्षांना विजयासाठी कसरत करावी लागेल. 

पोपट पवार -चेन्नई : तामिळनाडूत द्रविडी राजकारणापासून चार हात दूर असलेला वणियार समाज आता महत्त्वाची भूमिका निभावू पाहतो आहे. धर्मपुरीसह उत्तर तामिळनाडू परिसरातील ३० मतदारसंघांत कोणाला निवडून द्यायचे, हे या समुदायाच्या हाती आहे. त्यामुळे या समाजाला चुचकारण्यासाठी सर्वच पक्षांनी पायघड्या घातल्या आहेत. (‘Waniyar’ power in the 30 constituencies in tamil nadu)अण्णा द्रमुकशी आघाडी केलेला एस. रामदास यांचा पीएमके या समुदायाचे नेतृत्व करीत आला आहे. पीएमके २३ जागा लढवीत असून, त्यातील बहुतांश जागा उत्तर तामिळनाडूतील आहेत. तिथे विरोधी पक्षांना विजयासाठी कसरत करावी लागेल.  निवडणुकीच्या तोंडावरच वणियार समुदायाला शिक्षण व नोकरीत साडेदहा टक्के आरक्षण देऊन अण्णा मांड पक्की केल्याचे मानले जाते. गेल्या निवडणुकीत सर्व २३४ ठिकाणी उतरूनही पीएमकेला एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र, साडेपाच टक्क्यांपेक्षा जास्त मते घेऊन अनेक मतदारसंघांत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे विजयाचे गणित बिघडविले होते. भाजपलाही लाभकुख्यात चंदनतस्कर वीरपन्नही वणियार समाजाचा होता. सध्या त्याची मुलगी विद्याराणी ही भाजपची पदाधिकारी आहे. विखुरलेल्या वणियार समाजाची मते मिळविण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.

वणियार समाजाचा कल कुणीकडे?पीएमकेला २०११ मध्ये द्रमुकसोबत आघाडी करूनही तीन जागा मिळाल्या होत्या, मात्र २०१६ साली पक्षाचा आलेख शून्यावर आल्याने यंदा पीएमकेने अण्णा द्रमुककडून २३ जागा मिळवल्या. अर्थात वणियार समाज खरोखर पीएमकेबरोबर आहे का, हे मतदानातून स्पष्ट होईल. 

टॅग्स :Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१TamilnaduतामिळनाडूElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा