भारताचे बहुप्रतीक्षित 'चंद्रयान 3' लॉन्च होण्याचा दिवस अगदी जवळ आला आहे. इस्रोने गुरुवारी जाहीर केल्यानुसार, 'चंद्रयान-3' 14 जुलैला लॉन्च होईल. चंद्रयान-3 घेऊन जाणारे इस्रोचे रॉकेट श्री हरिकोटाच्या लॉन्चपॅडवर नेण्यात येत आहे. याचा एक व्हडिओही समोर आला आहे.
अनेक लोकांना हे लॉन्च डोळ्याने समोरा समोर पाहण्याची इच्छा आहे. सर्वासामान्य नगरिकांना चंद्रयान-3 चे प्रक्षेपण पाहता यावे यासाठी इस्रोच्या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन विंडो देण्यात आली आहे.
या वेबसाइटच्या माध्यमाने केले जाऊ शकते रजिस्ट्रेशन -lvg.shar.gov.in या वेबसाइटवर जाऊन देथे देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करून सोप्या पद्धतीने रजिस्ट्रेशन केले जाऊ शकते. वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटमध्ये इस्रो स्पेस थीम पार्क विकसित करत आहे. या स्पेस थीम पार्कमध्ये रॉकेट गार्डन, लॉन्च व्ह्यू गॅलरी आणि स्पेस म्यूझिअमचा समावेश असेल. सध्या लोकांसाठी लॉन्च व्ह्यू गॅलरी आणि स्पेस म्यूझिअम खुले झाले आहे.
इस्रोचे नवे लॉन्च व्हेईकल LVM-3 ही चांद्रयान मोहीम पार पाडेल. इस्रोने गुरुवारी एका ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली, ट्विटमध्ये इस्रोने म्हटले आहे, चंद्रयान-3: एलव्हीएम3-एम4/चंद्रयान-3 मिशन लॉन्च 14 जुलै, 2023 रोजी दुपारी 2:35 वाजता एसडीएससी (सतीश धवन स्पेल सेंटर), श्रीहरिकोटा येथून होईल.
याशिवाय, इस्त्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनीही या संदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले, चंद्रयान-3 मिशन अंतर्गत इस्रो 23ऑगस्ट अथवा 24 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल.