Waqf Amendment Bill : वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 बुधवारी लोकसभेत बहुमताने मंजूर झाले. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या वक्फ दुरुस्ती विधेयकाचा जोरदार विरोध केला. मात्र, लोकसभेत या विषयावरील चर्चेत त्यांनी भाग घेण्याचे टाळले. गुरुवारी (3 एप्रिल, 2025) वृत्तसंस्था IANS शी बोलताना राहुल गांधींच्या या कृतीबद्दल मुस्लिम नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB) सदस्य मौलाना खालिद रशीद फिरंगी महाली आणि ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्ड (AISPLB) सरचिटणीस मौलाना यासूब अब्बास म्हणाले की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी मुस्लिम समाजाच्या वतीने लोकसभेत बोलतील अशी अपेक्षा होती.
राहुल गांधी मतदान करुन निघून गेलेराहुल गांधी 2 एप्रिल रोजी विधेयकाबाबत पक्षाच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी वरिष्ठ काँग्रेस नेते आणि खासदारांसोबत बैठकीसाठी संसदेत उपस्थित होते. मात्र, वक्फच्या महत्त्वाच्या चर्चेला ते गैरहजर राहिले. नंतर ते मतदानासाठी हजर झाले, मात्र चर्चा सुरू होण्यापूर्वीच त्यांनी काढता पाय घेतला.
दरम्यान, आयएएनएसशी बोलताना मौलाना महाली म्हणाले, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याने सभागृहात याबाबत कोणतेही विधान न केल्याने मला आश्चर्य वाटले. मला आशा होती की, काँग्रेसाच्यावतीने राहुल गांधी योग्य भूमिका घेतील. तर, मौलाना अब्बास म्हणाले, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला हव्या होत्या. मला अपेक्षा होती की, किमान प्रियंका गांधी येतील, मात्र त्याही आल्या नाही.
मुस्लिमांसाठी बोलण्याचा काँग्रेसचा इतिहासते पुढे म्हणाले, आम्हाला प्रियंका गांधींमध्ये इंदिरा गांधी दिसतात. मुस्लिमांना पाठिंबा देण्याचा आणि त्यांच्यासाठी बोलण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे. पक्षाने विधेयकाच्या विरोधात मतदान केले, पण मला राहुल गांधींचे लोकसभेत बोलणे ऐकायचे होते.