नवी दिल्ली - विधेयक लोकसभेमध्ये बुधवारी चर्चेसाठी येणार आहे. त्याला विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध होणार आहे. या विधेयकावर सभागृहात सुमारे आठ तास चर्चा होणार असून नंतरवक्फ सुधारणा, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू हे उत्तर देतील, असे सूत्रांनी मंगळवारी सांगितले. त्यानंतर हे विधेयक मंजूर करण्यासाठी मतदान घेतले जाण्याची शक्यता आहे.
आपला अजेंडा लादण्याचा केंद्राचा प्रयत्न : काँग्रेस लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी सांगितले की, केंद्र सरकार आपला अजेंडा सर्वांवर लादण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे विरोधक लोकसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून निघून गेले. -
लोकसभेत दुपारी १२ वाजता हे विधेयक चर्चेसाठी ठेवले जाईल, गुरुवारी राज्यसभेत हे विधेयक सादर होईल.
दोन्ही सभागृहांमध्ये संख्याबळाचे गणित लोकसभा राज्यसभाएकूण खासदार ५४३ २३६बहुमतासाठी आवश्यक २७२ ११९एनडीए २९३ १२१इंडिया २३५ ८५अन्य १५ ३०(लाेकसभेत टीडीपी-जदयूच्या २८ खासदारांवर अवलंबून)(राज्यसभेत ६ नामनिर्देशित खासदारांच्या पाठिंब्यावर अवलंबून)