वक्फ बोर्ड अध्यक्षाला एक लाखाची लाच घेताना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 07:16 AM2021-06-30T07:16:23+5:302021-06-30T07:17:03+5:30

न यांनी अब्बासी यांना समितीच्या अध्यक्षपदी राहू द्यावे यासाठी ५ लाख रुपये लाच मागितली होती

Waqf board chairman caught taking Rs one lakh bribe | वक्फ बोर्ड अध्यक्षाला एक लाखाची लाच घेताना पकडले

वक्फ बोर्ड अध्यक्षाला एक लाखाची लाच घेताना पकडले

googlenewsNext

रेवा (मध्य प्रदेश) : रेवा जिल्हा वक्फ बोर्डचे अध्यक्ष इरफान खान यांना मध्यप्रदेश लोकायुक्त पोलिसांनी मंगळवारी १ लाख रुपयांची लाच घेताना पकडले. रेवातील छोटी दर्गा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनास अब्बासी यांना याच पदावर कायम राहू द्यावे यासाठी ही लाच घेण्यात आली,
असे पोलीस अधीक्षक (लोकायुक्त स्पेशल पोलीस इस्टाब्लिशमेंट) राजेंद्र वर्मा यांनी म्हटले.

न यांनी अब्बासी यांना समितीच्या अध्यक्षपदी राहू द्यावे यासाठी ५ लाख रुपये लाच मागितली होती. शेवटी एक लाखात व्यवहार ठरला. ही समिती जिल्हा वक्फ बोर्ड अंतर्गत काम करते. मिळालेल्या तक्रारीनंतर लोकायुक्तांनी (एसपीई) जाळे लावले आणि खान यांना रेवात रुग्णालयाजवळ १ लाख रुपये घेताना पकडले, असे वर्मा म्हणाले. खान यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.
 

Web Title: Waqf board chairman caught taking Rs one lakh bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.