जम्मू-काश्मीर- सुंजवानमधल्या लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा श्रीनगरमधल्या करणनगरमधल्या सीआरपीएफ हेडक्वॉर्टरवर हल्ला केला आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यांत लष्कराच्या जवानांबरोबरच स्थानिकांनाही हकनाक प्राण गमवावे लागत आहेत.तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पाकिस्तानबरोबर युद्ध हा पर्याय नाही, असं म्हटलं आहे. काश्मीरमधील हिंसाचार थांबवण्यासाठी पाकिस्तानबरोबर चर्चेशिवाय पर्याय नाही. रक्तपात रोखण्यासाठी ते गरजेचं आहे. मला माहीत आहे की, टीव्ही न्यूज चॅनेलच्या अँकरकडून मला देशद्रोही ठरवलं जाईल. मला याचा काही फरक पडत नाही. जम्मू-काश्मीरची माणसे त्रास सहन करतायत. त्यामुळे पाकिस्तानशी चर्चा करावीच लागेल. युद्धा हा काही पर्याय असू शकत नाही, असं मेहबुबा मुफ्ती ट्विटर अकाऊंटवरून म्हणाल्या आहेत.
पाकिस्तानशी युद्ध हा पर्याय नाही, रक्तपात रोखण्यासाठी चर्चा करू या- मेहबुबा मुफ्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 4:44 PM