शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सीमेवर युद्धसज्जता, सामर्थ्य वाढविणार! लष्कर आखतेय नवी योजना; अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 6:58 AM

Indian Army: भविष्यात येणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आपली युद्धसज्जता व संरक्षण सामर्थ्य वाढविण्याच्या दृष्टीने भारतीय लष्कर सध्या एक योजना तयार करत आहे. 

नवी दिल्ली - भविष्यात येणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आपली युद्धसज्जता व संरक्षण सामर्थ्य वाढविण्याच्या दृष्टीने भारतीय लष्कर सध्या एक योजना तयार करत आहे. 

लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतीय लष्कराकडे असलेली साधनसामग्री, मनुष्यबळ, आदी गोष्टींचा विचार करून एक नवीन धोरण आखण्यात येणार आहे. युद्धसामर्थ्य वाढविण्याबरोबरच संसाधनदृष्ट्या भारतीय लष्कर अधिक सक्षम करण्याकरिता पावले उचलली जातील.

लष्कराला लागणाऱ्या संरक्षण उत्पादनांच्या निर्मितीबाबत भारत आत्मनिर्भर होणे अतिशय आवश्यक आहे. लष्कराकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असण्याबरोबरच संरक्षणविषयक अन्य सुविधांचा विकास करण्यात येणार आहे.

‘लष्कराने दहशतवादाचा केला कठोर मुकाबला’- देशाच्या सीमांचे रक्षण व दहशतवादाचा मुकाबला लष्कराने समर्थपणे केला आहे असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग हे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या एका बैठकीत म्हणाले.- सीडीएस जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख मनोज पांडे, नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार यांचीही भाषणे यावेळी झाली. 

सरकारशिवाय निधी उभारणारकेंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीव्यतिरिक्त आणखी निधी उभारण्याकरिता काय पर्याय अमलात आणता येतील याचा लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत विचार करण्यात आला. 

लष्करावर गाढ विश्वाससीमाभागात पायाभूत सुविधांचा होणारा विकास तसेच या भागात संरक्षणदृष्ट्या उचलण्यात आलेली पावले यांच्यात समन्वय साधला जाणार आहे.सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची दर दोन वर्षांनी अशी बैठक आयोजिण्यात येते. यंदाची बैठक मंगळवारी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.देशातील ज्या यंत्रणांवर जनतेचा गाढ विश्वास आहे, त्यामध्ये लष्कराचा समावेश होतो, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या बैठकीत सांगितले होते. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानDefenceसंरक्षण विभाग