विकास झाडेलोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाने पुन्हा तोंड वर काढले आहे. २४ तासामध्ये सर्वाधिक २२ हजार ८५४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून दिल्ली, पंजाब आणि महाराष्ट्रातील आकडे चिंताजनक दिसून येतायेत.एकीकडे शेतकरी आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे नवीन कोरोना रुग्णांचा आलेख वेगाने वाढत आहे. दिल्लीमध्ये गेल्या २४ तासामध्ये १२० प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली का? यावर आता चर्चा सुरू झाली आहे. देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेचा शेवट संपुष्टात आल्यानंतर सात दिवसांच्या सरासरीने नवीन कोरोना प्रकरणात ६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दि. ११ फेब्रुवारीपर्यंत देशात दररोज कोरोनाची प्रकरणे ११ हजारच्या जवळपास होती. एका दिवसात महाराष्ट्रात ७०६७, तर पंजाबमध्ये ६६७ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.नवीन कोरोना विषाणूची लक्षणे आणि भय व शंका! एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी, भारतात नवीन कोरोनाचा त्रास अधिक संसर्गजन्य असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली.
एम्सचे प्राध्यापक डॉ. अमरिंदरसिंग म्हणतात, ‘हा कोरोना विषाणूचा परिवर्तित ताण आहे, म्हणूनच तो जीवघेणा आहे. अधिक तीव्रतेने पसरत आहे असे दिसते.’ आपल्या लक्षात आले असेल की, लंडनमधील मृत्यूचे प्रमाण खूपच वाढले आहे. ज्यांना यापूर्वी कोरोना झाला होता त्यांनाही नव्याने बदल झालेल्या कोरानामुळे पुन्हा संसर्ग होऊ लागला आहे. पूर्वी तयार केलेल्या अँटिबॉडीज त्यावर कार्य करणार नाहीत. हा विषाणूचा परिवर्तित ताण असल्याने सध्याची लसदेखील प्रभावी असल्याचे सिद्ध होत नाही. तथापि, चांगली गोष्ट म्हणजे आपण तयार केलेली लस या परिवर्तित ताणाविरुद्ध स्वतंत्रपणे तयार केली जाऊ शकते.सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन (सीडीसी) यांनी २०२० मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार कोविड -१९ ची लक्षणे कमी होण्यास आठवडे लागू शकतात आणि लोक आपल्या आरोग्याच्या सामान्य स्थितीत परतू शकतात.
दीर्घकालीन प्रभावnजागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, काही लोकांना कोविडचे दीर्घकालीन प्रभाव जाणवू शकतात. या दीर्घकालीन प्रभावांमध्ये थकवा, श्वसन लक्षणे आणि न्यूरोलॉजिकल लक्षणांचा समावेश असू शकतो. nकाही संशोधने असे सूचित करतात की, कोविड -१९ ची सौम्य लक्षणे असलेले लोक सहसा कोरोना संसर्ग झाल्यापासून एक ते दोन आठवड्यांच्या आत बरे होतात. गंभीर प्रकरणांमध्ये निरोगी होण्यासाठी सहा आठवडे किंवा त्याहून अधिक वेळ लागू शकतो.