नवी दिल्ली - देशावर एकीकडे कोरोनाचं मोठं संकट असताना दुसरीकडे राज्यावर आणखी एक संकट आलं. पाकिस्तानमधून आलेले टोळ कीटक मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात शिरले आहेत. मध्यप्रदेशाच्या सीमेवरून मोर्शी, वरूड व मेळघाटात टोळधाड दाखल झाली आहे. वाळवंटी टोळांनी राज्यातील 20 जिल्ह्यांतील 90 हजार हेक्टरवरील पिके फस्त केली. मध्यप्रदेश आणि राजस्थानातही टोळधाडीचा धुमाकूळ सुरू असून, हरयाणात हायअलर्ट जारी करण्यात आला. ही 26 वर्षांतील सर्वांत मोठी टोळधाड आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा देशात टोळधाड धडकणार असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे.
पुढच्या महिन्यांत म्हणजेच जुलैमध्ये पुन्हा एकदा देशात टोळधाडीचं संकट येणार असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने दिला आहे. त्यानंतर केंद्राने राजस्थान आणि मध्य प्रदेशसह 16 राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. FAO ने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनपूर्वी मे महिन्यात टोळधाड दक्षिण-पश्चिम पाकिस्तानातून राजस्थानात दाखल झाले आणि 1962नंतर प्रथमच टोळधाडाचं संटक आलं. राजस्थानच्या वाळवंटात पावसाळा सुरू होताच प्रजननासाठी टोळधाड पूर्वे व पश्चिमेकडे फिरतील. त्यामुळे जूनमध्ये ते दक्षिण इराण आणि जुलैमध्ये हॉर्न ऑफ आफ्रिका द्वीपकल्पात असतील.
तज्ज्ञांच्या मते पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील शेती खराब करणारे टोळधाड एप्रिलमध्ये पाकिस्तानातून भारतात आले. उत्तर-पूर्व सोमालियाला पोहोचणारे टोळधाड उत्तर हिंद महासागरातील भारत-पाकिस्तान सीमा भागात प्रवेश करणार आहे. सोमालिया आणि इथिओपियामध्येही अशीच परिस्थिती आहे. जूनच्या मध्यानंतर हे टोळधाड केनिया ते इथिओपिया आणि उत्तर सुदानपासून दक्षिण सुदानकडे जातील. मुख्य म्हणजे हे टोळ एका दिवसात 150 किलोमीटर पर्यंत उड्डाण करू शकतात आणि चौरस किलोमीटर असलेले ते जास्तीत जास्त 35,000 लोकांऐवढं खाऊ शकतात.
राजस्थान सरकारच्या टोळधाड चेतावणी संस्थेचे अधिकारी केएल गुर्जर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील बाडमेर आणि जोधपूर जिल्ह्यातील अनेक गावात टोळधाडचा हल्ला सुरू आहे. 65 हजार हेक्टर क्षेत्रावर टोळांवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्यात टोळधाड दिसले नाही आहेत. एका हिंदी वेबबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. शेतावर पिके कमी असल्यामुळे टोळ सध्या झाडे आणि अन्य खाद्यपदार्थांना लक्ष्य बनवीत आहेत. पिकांची अनुपलब्धता असल्यामुळेच टोळ पाकिस्तानातून इतके अंतर पार करून भारताच्या विविध राज्यांत शिरले आहेत.
मध्यप्रदेशातील मालवा भागात टोळधाड आल्या आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, गुजरात आणि मध्यप्रदेश या पाच राज्यातील शेतकऱ्यांना टोळधाडीमुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तथापि, कृषि मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, या राज्यांमध्ये टोळ नियंत्रण अभियान सुरु करण्यात येत आहे.राजस्थानातील बारमेर, जोधपूर, नागौर, गंगानगर, हनुमानगड, जयपूर जिल्ह्यात तसेच मध्यप्रदेशातील सतना, ग्वाल्हेर, राजगड, बैतुल, देवास, आगर मालवा जिल्ह्यात टोळ सक्रीय आहेत. महाराष्ट्रात काही भागात किटकनाशकांची फवारणी करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : खरंच की काय? लॉकडाऊनमध्ये वाया गेलेली वाईन वाचवणार आता लोकांचा जीव; पण कसा...
CoronaVirus News : सर्वसामान्यांसाठी खूशखबर! 'या' जीवनावश्यक वस्तू झाल्या स्वस्त
CoronaVirus News : शाळा सुरू करणं 'या' देशाला पडलं महागात; तब्बल 261 जणांना कोरोनाची लागण
CoronaVirus News : लवकर रेस्टॉरंट सुरू होणार, 'या' गोष्टी बदलणार; जाणून घ्या नेमकं कसं असणार?