शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

'त्या' विमानाच्या मागे होते मोदींचे विमान

By admin | Published: July 18, 2014 11:35 AM

मलेशियन एअरलाइन्सच्या अपघातग्रस्त विमानाच्या मागे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही विमान होते अशी माहिती आता समोर येत आहे.

 

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १७- मलेशियन एअरलाइन्सच्या अपघातग्रस्त विमानाच्या मागे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही विमान होते अशी माहिती आता समोर येत आहे. मलेशियन विमानाला अपघात झाल्यावर मोदींचे विमान कोणत्या मार्गाने भारतात आणायचे असा प्रश्न होता. मात्र तासाभराने परिस्थिती नियंत्रणात आल्यावर युक्रेनच्या हवाई हद्दीतून हे विमान भारतात आले व सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा श्वास घेतला.
गुरुवारी नरेंद्र मोदी हे ब्राझीलमधील ब्रिक्स देशांची बैठक संपवून मायदेशी परतत होते. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार युक्रेनमधील टोरेझ परिसरात क्षेपणास्त्र हल्ल्याद्वारे पाडण्यात आलेल्या मलेशियन विमानाच्या मागेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही विमान होते. एअर इंडियाच्या ००१ या विमानाने फ्रँकफर्ट विमानतळावरुन उड्डाण केले होते. मलेशिया विमान ज्या भागात कोसळले ते टोरेझ शहर फ्रँकफर्टपासून तीन तासांवर आहे. फ्रँकफर्टवरुन उड्डाण घेतल्याच्या तीन तासांनी हे विमान युक्रेनच्या हवाई हद्दीत दाखल होणार होते. मलेशियन विमानाच्या मार्गानेच मोदींचे विमानही जाणार होते. 
सुदैवाने मोदींचे विमान फ्रँकफर्टवरुन उड्डाण घेण्यापूर्वीच मलेशिया विमानाला अपघात झाला होता. त्यामुळे आता मोदींचे विमान कोणत्या मार्गाने न्यायचे असा प्रश्न वैमानिकांना पडला होता. रशियाच्या हवाई हद्दीतून किंवा काळा समुद्रावरुन विमान न्यायचे असे पर्याय वैमानिकांसमोर होते. अखेरीस युक्रेन हवाई हद्दीतून विमान भारतात आले व विमानतळार मोदींचे विमान लँड होताच सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मलेशिया विमानाच्या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.